नाशिक ग्रामीण

शैक्षणिक संस्थेला अडचणीत आणा -या शहा ग्रामपंचायतीच्या विरोधात आज सिन्नर गटविकास कार्यालयासमोर धरणे आंदोलन…

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे

सिन्नर , दि : 15 ऑक्टोबर 20250–

                ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शहा येथील सामाजिक कार्यकर्ते विजय घोडेराव यांनी चालु वर्षी लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल या नावाने शाळा सुरू केली आहे.  परंतु या शाळेच्या वर्ग खोल्यांची ग्रामपंचायतीच्या दप्तरी नोंद केली जात नसल्याचा आरोप संस्था चालक विजय घोडेराव यांनी केला आहे… सरपंच व ग्रामसेवक या नोंदी साठी आपल्या उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ करत आहे… गेल्या आठ नऊ वर्षापासून एका जागेवर काम करत असलेल्या ग्रामसेविका ह्या कोणाच्या दबावाखाली येऊन या कामाला अडचणीत आणत आहे याची सखोल चौकशी होऊन सदर ग्रामसेविका याची तातडीने बदली करण्यात यावी व या जागेवर नव्याने ग्रामसेवकांची नेमणूक करावी अशी मागणी  ग्रामस्थांसह विजय घोडेराव यांनी केली आहे . या संदर्भात घोडेराव यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून आज सिन्नर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल अशी माहिती प्रसिद्ध पत्रका द्वारे केली आहे..

          शहा ग्रामपंचायतचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर … शैक्षणिक संस्थेला अडचणीत आणणाऱ्या संबंधित ग्रामपंचायतच्या पदाधिकारी व अधिकारी यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. याबद्दल सविस्तर माहिती अशी की सामाजिक कार्यकर्ते विजय गोरडे यांनी लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल नावाने संस्था चालू केली असून सर्वसाधारण गोरगरिबांसाठी शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे परंतु काही प्रस्थापित राजकीय हस्तक्षेप व ग्रामपंचायत ग्रामपंचायतच्या पदाधिकारी व कर्मचारी यांच्या स्वार्थी धरणामुळे एका शैक्षणिक संस्थेला वेठीस धरणे योग्य नाही यासाठी संस्था चालक विजय घोडेराव यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असून 15 ऑक्टोबर पासून सिन्नर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचं विजय घोडेराव यांनी सांगितले आहे सदर ग्रामपंचायतची ग्रामसेविका ह्या गेल्या नऊ वर्षापासून एका जागेवर काम करण्याचे कारण काय यामागे निश्चितच आर्थिक मलीदा लाटण्यासाठी शहागाव सोडण्याचे इच्छा होत नसेल असा ग्रामस्थांचा अनेक दिवसापासून चा आरोप होत आहे. हे कारण आता आमच्याही लक्षात येऊ लागला आहे असेही विजय घोडेराव यांनी सांगितले यासाठी त्यांनी आंदोलनाची हत्यार उपसले असून या सर्व गोष्टीची सखोल चौकशी होऊन योग्य न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे..

       या संदर्भात ग्रामपंचायतीच्या दप्तरी नोंद होण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. त्यामुळे नोंद होण्यासाठी अडचण असल्याचे ग्रामपचायतीकडुन सांगण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे..

Protest against Shah Gram Panchayat for putting educational institution in trouble in front of Sinnar Group Development Office today

भाऊसाहेब हांडोरे

भाऊसाहेब हांडोरे - पत्रकार... सिन्नर वेगवान मिडिया साठी कार्यरत, गेल्या 26 वर्षेपुर्वी दैनिक गावकरी या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून सुरुवात ... दै. सकाळ , लोकमत, देशदुत, पुण्यनगरी. राम भुमी, पत्रकार म्हणून काम..... 2023 पासून वेगवान मराठी. वेगवान नाशिक. वेगवान न्यूज या मिडिया नेटवर्कर सिन्नर तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत... उद्योग.शेती.क्राईम.खेळ.बिजिनेस. व राजकीय घडामोडी.सामाजिक. क्षेत्रात सखोल माहिती. लेखन व वाचन ची आवड....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!