नाशिक ग्रामीण

नांदगाव मनमाड नॅशनल हायवेवर पाच प्राण्यांचा बळी

Nandgaon News

नांदगाव–मनमाड राष्ट्रीय महामार्गावर

पाच प्राण्यांचा बळी

वेगवान मराठी : मारुती जगधने

नांदगाव ( दि. ५ सप्टेंबर 2025) –या नॅशनल हायवे वरती लहान मोठे अपघात तर झालेच आहे अनेकांचे बळी देखील याच्यात गेलेले आहेत तसेच अनेक वन्यप्राण्यांची देखील मार्गावरती बळी गेलेली आहे त्यातच आता नव्याने .

नांदगाव जवळील मनमाड–नांदगाव राष्ट्रीय महामार्ग क्र N H. ७५३जे वर गेल्या तीन दिवसांत अपघातांची मालिकाच सुरू असून अवघ्या दोन किलोमीटरच्या अंतरात (दुसरा, तिसरा व चौथा किमी) पाच कुत्रे व दोन मांजरी वाहनांच्या चाकाखाली येऊन ठार झाले. दररोज या महामार्गावरून धावणाऱ्या वेगवान वाहनांमुळे भटक्या प्राण्यांचे जीव धोक्यात येत आहेत.

धोकादायक प्रवृत्ती : पिल्लांना महामार्गावर सोडणे

स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेल्या माहितीप्रमाणे, काही लोक आपल्या वस्तीतील वा गल्लीत जन्मलेली कुत्र्यांची पिल्ले रस्त्यावर आणून सोडतात. महामार्गावर अन्न वा पाणी मिळेल या अपेक्षेने ही पिल्ले भटकतात. पण रस्त्यावर प्रचंड वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे त्यांचे मृत्यू निश्चित ठरतात. त्यामुळे फक्त भटकेच नाही, तर मानवाकडून टाकलेल्या पिल्लांचाही या अपघातांत बळी जातो.

गेल्या तीन दिवसांची हकिगत

पाच कुत्रे मृत: यामध्ये लहान पिल्ले आणि मोठ्या कुत्र्यांचा समावेश.

दोन मांजरीं वाहन धडकून ठार.

वेळ: बहुतांश घटना सकाळ, दुपार ,संध्याकाळ व रात्री घडल्या.

ठिकाण: नांदगाव–मनमाड रस्त्यावरील २ ते ४ किलोमीटर पट्टा.

नागरिकांची भावना

स्थानिक नागरिकांचा संताप व्यक्त होत असून त्यांचे म्हणणे आहे की –

महामार्गावर वेगमर्यादा फलक, ब्रेकर वा चेतावणी फलक नाहीत.

रस्त्यालगत कचरा व उरलेले अन्न टाकले जाते, त्यामुळे प्राणी रस्त्याजवळ येतात

“आमच्या डोळ्यासमोर पिल्लांचा चिरडून मृत्यू होतो, हे पाहणे असह्य आहे,” अशी प्रतिक्रिया एका रहिवाशाने दिली.

प्रशासनाने व नगरपालिकेने / ग्रामपंचायती ने भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणाचे ठोस उपाय करावेत. तसेच कुत्रे रस्त्यावर सोडणारे वर CCTV च्या नजरेतून कारवाई करावी .

अपेक्षित उपाय

. प्राणी संरक्षण: भटक्या प्राण्यांचे स्टेरिलायझेशन व लसीकरण मोहीम.

. महामार्ग सुरक्षितता: रंबल स्ट्रिप्स, वेगमर्यादा फलक, “प्राणी सावधान” बोर्ड लावणे.

. कचरा नियंत्रण: महामार्गालगत कचरा टाकण्यास बंदी; चे फलक व नियमित स्वच्छता.

. नागरिकांवर नियंत्रण: पाळीव प्राणी वा पिल्ले महामार्गावर सोडल्यास दंडात्मक कारवाई.

. रात्री प्रकाशयोजना: कार्यरत स्ट्रीटलाईट व रिफ्लेक्टर्स.

अवघ्या दोन किलोमीटरच्या पट्ट्यात इतक्या प्राण्यांचा बळी जाणे ही गंभीर बाब आहे. वाहनचालकांची बेफिकिरी, प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि नागरिकांची निष्काळजी वृत्ती – या तिन्हींचा मिळून हा प्रकार घडत आहे. प्राणी हेही सजीव आहेत, त्यांचे जीव वाचवणे ही नागरिकांची आणि प्रशासनाची जबाबदारी आहे.यापूर्वी याच मार्गावरती अपघातात मनुष्यहानी व वन्य प्राण्यांची मृत्यू झालेला आहे .

नांदगाव राष्ट्रीय महामार्गावर कचऱ्याचा प्रश्‍न

नांदगाव राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला नागरिकांकडून घरगुती कचरा, धार्मिक कार्यक्रमांतील उरलेले साहित्य, पत्रावळ्या व प्लॅस्टिक सर्रास फेकून दिले जात आहे. त्यामुळे महामार्गाची शोभा कमी होत असून दुर्गंधी, अस्वच्छता आणि अपघाताचा धोका वाढतो आहे. सुंदर व सुस्थितीत असलेला रस्ता कचऱ्यामुळे कुरूप दिसत आहे. प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी आणि रस्त्यालगत कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!