नाशिक ग्रामीण

शिर्डी महामार्गावर प्रवास करत असाल तर सावधान ,,, ,,,

शिर्डी महामार्गावर दुचाकीस्वारस मारहाण करणाऱ्या तिघांना अटक ...

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे

शिर्डी महामार्गावर दुचाकीस्वारास मारहाण करणाऱ्या तिघांना अटक …

 

नाशिक / सिन्नर : दि,   शिर्डी महामार्गावर प्रवास करत असाल तर सावधान .. …

 

                  गेल्या काही महिन्यात दिनांक २४ ऑगस्ट रोजी सिन्नर शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर मिरगाव फाटा परिसरात दुचाकीवरून कोपरगाव कडे जाणाऱ्या एकाच अडवून तिघा जणांनी मारहाण केली होती. या घटनेत त्याच्याजवळील पंधरा हजार रुपये रोख रक्कम, दुचाकीची चावी घेऊन हल्लेखोर पसार झाले होते.

वावी पोलिसांनी या प्रकरणात तिघा जणांना अटक केली असून त्यांनी सदर दुचाकीस्वारास मारहाण केल्याची कबुली दिली आहे.

 

सुधाकर वक्ते वय ३५ हे वावी येथे गेल्या वीस वर्षांपासून पॅथॉलॉजिकल लॅब चालवतात. मारहाणीची घटना घडली त्या दिवशी ते नेहमीप्रमाणे कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथे घरी जात असताना सायंकाळी सात वाजेच्या सुमारास दोन दुचाकी वरून आलेल्या चौघाजणांनी वक्ते यांना मिरगाव फाटा परिसरात दुचाकी आडवी मारून थांबण्यास भाग पाडले. त्यांना लाथा बुक्क्यांनी व हातातील दांड्याने मारहाण करत खिशातील १५ हजार रुपये व दुचाकीची चावी हिसकावून घेतली. मारहाण करणारे त्यांच्या दुचाकीवरून कोपरगावच्या दिशेने पसार झाले होते. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात रस्ता लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कोठावळे, तपास अंमलदार अमोल गोडे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने तपास करून शुक्रवारी रात्री तिघांना अटक केली.

महेश बाबुराव सोळके (24) मुळ राहणार जेऊर कुभारी, ता. कोपरगाव, सध्या राहणार धात्रक फाटा, नाशिक. धीरज नंदकिशोर गुंडगळ (24) राहणार हरीदर्शन अपार्टमेंट, वृंदावन कॉलनी, जत्रा हॉटेल, नाशिक. भागवत भारत बांगर (25) मुळ राहणार लोखंडे वस्ती वडवणी जि. बीङ सध्या राहणार धात्रक फाटा के. के वाघ कॉलेज जवळ नाशिक अशी अटक केलेल्या तिघांची नावे असून त्यांचा चौथा साथीदार

अमर राकेश वळवी राहणार करंजवेळ, ता.नवापूर सध्या राहणार – जत्रा हॉटेल, नाशिक हा फरार आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकी देखील ताब्यात घेतल्या. अटक करून तिघांनाही पोलिसांनी सिन्नर न्यायालयात हजर केले असता त्यांना सोमवार पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

 

गुन्ह्यातील आरोपी आणि फिर्यादी लॅब टेक्निशियन या एकाच व्यवसायातील आहेत. संशयित महेश सोळके व

फिर्यादी वक्ते हे एकाच गावातील राहणारे असून त्यांच्यात एकमेकांशी जुना वाद असल्याने त्यातून मारहाणीचा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. मात्र मारहाण करत असताना संशयितांनी फिर्यादीला घटनेच्या दोन दिवस अगोदर गावात झालेल्या दोन गटातील वादाचा संदर्भ देत शिवीगाळ केली होती. पोलिसांकडून तपासात सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत.

भाऊसाहेब हांडोरे

भाऊसाहेब हांडोरे - पत्रकार... सिन्नर वेगवान मिडिया साठी कार्यरत, गेल्या 26 वर्षेपुर्वी दैनिक गावकरी या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून सुरुवात ... दै. सकाळ , लोकमत, देशदुत, पुण्यनगरी. राम भुमी, पत्रकार म्हणून काम..... 2023 पासून वेगवान मराठी. वेगवान नाशिक. वेगवान न्यूज या मिडिया नेटवर्कर सिन्नर तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत... उद्योग.शेती.क्राईम.खेळ.बिजिनेस. व राजकीय घडामोडी.सामाजिक. क्षेत्रात सखोल माहिती. लेखन व वाचन ची आवड....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!