वेगवान मराठीः मारुती जगधने
नांदगांव [दि 28 ऑगस्ट 2025 ]
नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्या नांदगांव निवासस्थानी यंदा गणेशोत्सवानिमित्त गणेश स्थापना करण्यात आली. पारंपरिक पद्धतीने सकाळी शुभमुहूर्तावर आमदार कांदे यांनी सपत्नीक पूजन करून श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली. या वेळी घरगुती तसेच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून आरती केली.
स्थापनेसाठी आकर्षक फुलांची सजावट व दीपमाळ लावण्यात आली होती. आमदार सुहास कांदे सौ अजुंमताई कांदे यांनी यावेळी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत समाजात ऐक्य, सौहार्द आणि प्रगतीचा संदेश दिला.



