नाशिक ग्रामीण
दिल्ली दरबारी खासदारांनी मांडली रस्त्याची व्यथा

वेगवान नाशिक / सागर मोर
दिंडोरी: नाशिक दिंडोरी वणी कळवण रस्ता चौपदरीकरण करण्याची आग्रही मागणी खासदार भास्कर भगरे यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचेकडे केली आहे.
दिल्ली येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे उपस्थितीत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची खासदार भास्कर भगरे यांनी नाशिक दिंडोरी वणी कळवण रस्त्याचे चौपदरीकरण, चेन्नई सुरत महामार्ग नाशिक आग्रा महामार्ग उड्डाणंपुल आदी सह मतदारसंघातील रस्ता प्रश्नावर भेट घेत सविस्तर चर्चा केली.
भगरे यांनी नाशिक दिंडोरी वणी कळवण हा रस्ता अंत्यत वर्दळीचा असून सदर रस्ता अरुंद आहे सातत्याने अपघात होत आहे. आगामी काळात सिहंस्थ कुंभमेळा होत असून गुजरात राजस्थान मधुन लाखो भाविक तसेच सिहंस्थ साठी येणारे भाविक हे वणी सप्तश्रुंग गडावर ही येणार असल्याने सदर रस्ता चौपदरीकरण होणे अत्यावश्यक असल्याचे भगरे यांनी गडकरी यांना सांगितले गडकरी यांनीही सदर रस्त्याचे चौपदरीकरण अत्यावश्यक आहे
असे सांगत सिहंस्थ नियोजन मध्ये सदर रस्ता चौपदरीकरण करण्याचे निर्देश देण्यात येतील असे आश्वासित केले.
चेन्नई सुरत महामार्ग कामास लवकरच मंजुरी
चेन्नई सुरत हा महत्वाकांशी महामार्ग रखडला असून.
सदर महामार्ग व्हावा संपादित होणाऱ्या जमीनींना योग्य मोबदला मिळावा अशी मागणी खासदार भगरे यांनी केली यावर केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सदर महामार्गाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्री मंडळापुढे असून त्याला लवकरच मंजुरी मिळेल असे आश्वासित केले.
दहावा मैल खडकजांब उड्डाणंपुलाचे काम सुरु तर शिरवाडे वणी फाटा सोग्रस फाटा येथेही होणार उड्डाणंपुल
नाशिक आग्रा महामार्गांवर विविध फाट्यावर वारंवार अपघात होत असून त्यांदृष्टीने उपाययोजना व्हाव्यात मंजूर असलेले दहावा मैल खडकजांब येथील उड्डाणंपुल भुयारी मार्ग जलदगतीने व्हावे सोग्रस फाटा शिरवाडे वणी फाटा येथेही उड्डाणं पूल व्हावा अशी मागणी केंद्रीय मंत्र्यांकडे करण्यात आली याबाबत गडकरी यांनी संबंधितांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या.



