येवला तालुक्यात इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमची भागवतराव सोनवणे यांची मागणी
येवला तालुक्यात इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमची भागवतराव सोनवणे यांची मागणी

वेगवान मराठी /एकनाथ भालेराव
येवला: दिनांक: 27सप्टेंबर /गेल्या काही दिवसांपासून येवला तालुक्याच्या पूर्व व उत्तर-पूर्व भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. शेतजमिनी, उभे पीक, जनावरांचे चारापाणी व घरे यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर प्रांतधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी व पशुवैद्यकीय अधिकारी यांना तातडीने इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम तयार करण्याची मागणी जलहक्क संघर्ष समितीचे संयोजक भागवतराव सोनवणे यांनी प्रांतधिकारी बाबासाहेब गाढवे यांना निवेदना द्वारे केली आहे.
या टीममध्ये ग्राममहसूल अधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांना समाविष्ट करून बाधित गावांमध्ये तत्काळ पंचनामे व मदतकार्य सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
*********
“शेतकरी व ग्रामस्थांना त्वरित मदत मिळावी म्हणून एक केंद्रीय हेल्पलाइन नंबर उपलब्ध करून द्यावा.शेतकऱ्यांचे नुकसान दिवसेंदिवस वाढत असल्याने शासनाने तातडीने मदतकार्य सुरू करावे ”
– भागवतराव सोनवणे, संयोजक जलहक्क संघर्ष समिती येवला.



