नाशिक ग्रामीण

बागलाण तालुक्यात कर्जाला कंटाळून शेतक-याची आत्महत्या

वेगवान नाशिक / मारुती जगधने

सटाणा, ता. 21 जुलै 2024 -देविदास तुकाराम भांबरे वय वर्ष 42 राहणार पिंगळवाडे तालुका बागलाण जिल्हा नाशिक या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली .

ते दिनांक 19 जुलैपासून बेपत्ता होते, त्यांचे बंधू विठ्ठल भामरे व इतरांनी शोध घेतला असता दिनांक 20 जुलै रोजी त्यांचा मृतदेह शेततळ्याच्या पाण्यावर तरंगताना दिसून आला.

सतत शेतीची नापिकी बँकेचे कर्ज उत्पादन पुरेशी मिळत नसल्याने भाव मिळत नव्हता. त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या शेतकऱ्याने आत्महत्या करून आपले जीवन संपविले.

या घटनेने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे घटनेची जायखेडा पोलिसात आकस्मित मृत्यूचे नोंद झाली असून ठाणे अंमलदार सागर काळे हे तपास घेत आहे .

नाशिक ब्रेकींग

गळफास घेऊन मुलीची आत्महत्या

चिठ्ठी लिहून केली आत्महत्या

माझ्या शिक्षणाचा खर्चाचा त्रास करून घेऊ नका असा चिट्ठीत मजकर

पूजा दीपक डांबरे असे मुलीचे नाव

सदर तरुणीची आई पोलीस दलात असल्याचे बोललं जातयं

बागलाण ब्रेकींग

विजेच्या खांबावर पाय घसरून पडल्याने मृत्यू

गणेश बापू देवरे वय 24 हा खामलोन (ता. बागलाण) असे कर्मचा-याचे नाव

सकाळी 11 वाजेच्या सुमारास घटना,

वीज वितरण कंपनीमध्ये मानधन तत्वावर सेवेत सुरु होते काम

बागलाण तालुक्यात हळहळ

 

वेगवान डिजीटल टीम

वेगवान डिजीटल टीम ही वेगवान कार्यालयातील उपसंपादक लोक हे वेगवान नाशिकच्या अधिकृत पॅनलवरुन बातमी चालवत असतात. सदर बातमी ही वेगवान मधील प्रमुख लोक चालवत असतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!