नाशिक ग्रामीणशेती

शेतातील चाळीसमोर स्वातंत्र्य दिन साजरा , व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी कांदा व रांगोळीच्या माध्यमातून वंदेमातरम नाव लिहीत कांदा उत्पादकाच्या मांडल्या व्यथा,

वेगवान नाशिक/तुषार रौंदळ
विरगांव दि.१५ ऑगस्ट २०२५:-
बागलाण तालुक्यासह संपुर्ण कसमादे मधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने शेतात पिकवलेला कांदा चाळीत साठवून ठेवलेला होता, मात्र, बदलत्या हवामानाचा फटका या कांद्याला बसला असुन ,त्यामुळे ७० ते ७५ % कांदा चाळीतच सडला आहे.तरीही सरकार कोणतीही ठोस व आश्वासक धोरण अवलंबतांना दिसत नाही आहे.सरकार जाणुनबुजून शेतकऱ्यांच्या विरोधी धोरण अवलंबत आहे का ? असं आता शेतकऱ्यांना वाटत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी ७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने इतरत्र कोठेही न जाता, आपल्या घराजवळ असलेल्या शेतातील चाळी समोर रांगोळी काढून शेतकरी संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यदिन साजरा केला.

चाळीतील कांद्याच्या सहाय्याने मोरेनगरचे व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी रांगोळीवर वंदे मातरम् हे नाव साकारत सर्वांचं लक्ष वेधून घेतले, संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा घोषणाबाजी करत जोरदार निषेध नोंदवला, चार पाच दिवसा पूर्वी व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना व्यंगचित्रातुन कांद्याची आजची परिस्थिती अवगत करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा संसदेच्या पटलावर मांडण्यास भाग पाडत सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते, आज शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष माणिक निकम व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने समन्वयक कुबेर जाधव, व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी एकत्र येऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा राज्यकर्त्याच्या निदर्शनास आणून देण्याच्या उद्देशाने अनोखे झेंडा वंदन साजरं केले.

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कांदेव रांगोळीतून वंदे मातरम् नाव साकारत शेतकऱ्यांनी जय जवान जय किसानचे फलकही हातात घेऊन सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले, या वेळी पंचक्रोशीतील अनेक कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते,
त्यामध्ये व्यंगचित्रकार किरण मोरे,वि का सोसायटी विठेवाडी चे मा, चेअरमन कुबेर जाधव, माणिकराव निकम, सोसायटी संचालक तानाजी निकम, कैलास कोकरे, रमेश निकम, भास्कर निकम, मधुकर निकम, भालचंद्र निकम, केदा निकम, कैलास निकम, सुनिल निकम माधा निकम, क्रुष्णा निकम, प्रदिप निकम,ह, भ,प, पपु निकम, संदीप निकम, तेजस निकम आदी तरूण शेतकरी सामिल झाले होते, या वेळी तरूण शेतकरी संजय निकम यांच्या वाढदिवसही अंत्यंत साध्या साजरा केला गेला.

तुषार रौंदळ

पत्रकारिता क्षेत्रात गेल्या २५वर्षापासुन असुन मी दैनिक लोकमत, दैनिक सकाळ, दैनिक दिव्य मराठी,दैनिक गावकरी, दैनिक आपलं महानगर यात पत्रकारिता केली असुन मला राजकीय, सामाजिक आर्थिक, पौराणिक ऐतिहासिक,कला क्रीडा यांचा सखोल अभ्यास केला असुन ते वेळोळी माझ्या लेखणीतून दिसली आहे.तसेच सोशल मीडिया,युटुब चॅनल वर चा मला १०वर्षाचा अनुभव आहे. तुषार रौंदळ हे बागलाण तालुक्यातील सटाणा येथून वेगवान नाशिक चे प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!