गणेश विसर्जन मिरवणुकीत ” मुलींना नाचवणं बंद करा —
मुलींना नाचवण्याचा अधिकार कोणी दिला.. पालकांच्या सवाल ,,, ?

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे
सिन्नर : दिनांक , 6 सप्टेंबर 2025 — आपल्या लाडक्या मुलामुलींना उच्च व दर्जेदार शिक्षण मिळावे व त्यांचं पुढील आयुष्य जगतांनां सुखी आणि सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी मोठ्या आशेने अकेडमी सारख्या महागड्या संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचा साठी पाठवतात.. परंतु हे संस्था चालक मणमानी पद्धतीने या मुलींचा वापर गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत नाचण्यासाठी करतात हे सत्य वास्तव समोर आले आहे.. त्यामुळे विविध सामाजिक संघटना सह पालक यांनी संताप व्यक्त केला आहे..

– गणपती विसर्जन मिरवणुकीत मुली नाचवणे थांबवणे गरजेचे… शरद शिंदे पाटील
आम्ही सिन्नर तालुक्यातील शेतकरी कामगार मजूर पालक आपणास कळवितो की आम्ही आमच्या मुली करियर अकेडमी क्लास या स्कुल मधे पोलीस अधिकारी बनवण्यासाठी दाखल केले आहेत. सदर करिअर अकेडमी शिक्षक यांनी आमच्या मुल मुली यांना आदर्श नागरिक घडवावे,अधिकारी घडवावे हि अपेक्षा व विश्वास ठेवत एडमिशन केले.ते काही गणपती विसर्जन मिरवणुकीत मुलींना नाचवण्यासाठी नव्हे. सदर अकेडमी हा कुठला पायंडा,संस्कृती रुजवत आहेत? आमच्या मुलींना सार्वजनिक मिरवणुकीत नाचवण्याचा अधिकार कुणी दिला?पालकांची सहमती घेतली का?
गणपती उत्सव हा पवित्र सण आहेत.हिंदू संस्क्रुतीत सार्वजनिक ठिकाणी दुसरयांच्या मुली नाचवणे संस्कार संस्कृती नाही. एकीकडे आम्ही मिरवणुकीत गुलाल उधळत नाही. आर्केस्ट्रा,कलाकार गणपती मिरवणुकीत नाचवणे बंद केले असताना हे अकेडमी तर आमच्या मुलींना नाचवत आहेत. याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. मुंबई पुणा नासिक ठिकाणी अकेडमी आहेत तिथ असे विचित्र प्रकार घडत नाही. आणि सिन्नर तालुक्यातील अकेडमी कुठली संस्कृती आणु पहात आहेत?एकतर कुठल्याही मिरवणुकीत मुल नाचतात त्याकडे समाज मदयपान करून नाचता असा गैरसमज समज झालेला आहेत. उदया समाज आमच्या मुलींकडे त्या नजरेने शंकेने बघेन.आमच्या मुलींना नाचवता… हौसच असेल तर अकेडमीच्या संचालक यांनी त्यांच्या घरचे किंवा नातलग यांना नाचवावे.नाचवाल?नाही ना.मग हे तात्काळ थांबवावे.
मराठा आरक्षण आंदोलक वेळ घालवण्यासाठी खोखो कबड्डी, कुस्ती खेळ खेळले तर मिडिया व समाज टिका करतो.तर करिअर घडवणारी अकेडमी गणपती मिरवणुकीत आमच्या शिकण्यासाठी पाठवलेल्या मुलींना नाचवता हे योग्य का?
क्रुपया सदर अकेडमी याना सुचना कराव्यात की गणपती विसर्जन करणारया मिरवणुकीत मुलींना नाचवू नये . या अनुषंगाने सिन्नर तालुक्यातील विविध सामाजिक संघटना व पालकांनी सिन्नर तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांना निवेदन देण्यात आले आहे. यावर काय कारवाई होते हे पहाणं महत्वाचे ठरणार आहे…




