जळगाव येथे राष्ट्रशाहीर सिद्राम बस्सप्पा मुप्पाटे जीवनगौरव पुरस्काराची घोषणा
Nandgaon News

जळगाव येथे राष्ट्रशाहीर सिद्राम बस्सप्पा मुप्पाटे जीवनगौरव पुरस्काराची घोषणा
वेगवान मराठी : मारुती जगधने
, ॥ दि. १८ ऑक्टोबर २०२५ ॥
खांदेश लोककला विकास प्रतिष्ठान, जळगाव यांच्या वतीने यंदाचा “राष्ट्रशाहीर सिद्राम बस्सप्पा मुप्पाटे जीवनगौरव पुरस्कार” जाहीर करण्यात आला असून, हा मानाचा पुरस्कार श्री. रमेश कदम यांना प्रदान करण्यात येणार आहे.
या पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र व रोख ५१ हजार रुपये, असे आहे.
हा पुरस्कार प्रदान समारंभ रविवार, २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जळगाव येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि खंडेश लोककला विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी लोककलाकार व चलचित्र कलाकार संमेलनात होणार आहे.
श्री. रमेश कदम यांनी साहित्य, सार्वजनिक कार्य आणि पत्रकारिता या क्षेत्रांत गेल्या 60 वर्षांहून अधिक काळ उल्लेखनीय सेवा बजावली आहे. त्यांच्या या सर्वांगिण योगदानाची दखल घेत प्रतिष्ठानतर्फे त्यांना हा जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
आचार्य अत्रे व शाहीर अण्णाभाऊ साठे यांचे शिष्य असलेले श्री. कदम यांनी वयाच्या १२ व्या वर्षी लेखन, चित्रकला, हस्तकौशल्य आणि गायन या क्षेत्रांत आपला ठसा उमटवला. वयाच्या १५ व्या वर्षापासून त्यांनी ‘समर्पित साप्ताहिक’ या माध्यमातून दलित, शोषित, कष्टकरी व भटक्या-विमुक्त समाजासाठी कार्य केले तसेच ग्रामविकास चळवळीतही सक्रिय सहभाग घेतला.
या संमेलनात खांदेश राज्यातील नामवंत शाहीर, लोककलावंत आणि चित्रपट कलाकार उपस्थित राहणार आहेत.
तसेच जळगाव येथे होणाऱ्या या अधिवेशनात अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, शाहीर अमरशेख प्रतिष्ठान, शाहीर साबळे प्रतिष्ठान, मराठी लोककला प्रतिष्ठान, भारतीय नृत्यकला प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र कलावंत प्रतिष्ठान या संस्थांच्या वतीने विविध अधिवेशने, अभ्यास शिबिरे आणि कलावंतांच्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे.
या समारंभाचे निवेदन श्री. विनोद डोंगरे (प्रमुख, अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद, जळगाव) यांनी केले.
श्री रमेश कदम हे मुळचे नांदगाव चे रहिवाशी आहेत .
या पुरस्काराने कदम यांचे विविध क्षेत्रातून तसे नांदगाव पत्रकार संघ आणि समस्त नांदगाव नगरीच्या वतीने हार्दिक अभिनंदन करत शुभेच्छा देण्यात येत आहे .



