टेक

उद्यानासाठी” १ कोटींचा निधी मंजूर

उद्यानासाठी" १ कोटींचा निधी मंजूर

वेगवान मराठी/ एकनाथ भालेराव

येवला, दि. 18 सप्टेंबर :-
येवला नगरपरिषद क्षेत्रामध्ये “नमो उद्यान” विकसित करण्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत या उद्यानाला मंजुरी मिळाली असून, शहरातील नागरिकांना एक उत्कृष्ट दर्जाचे उद्यान मिळणार आहे.

राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींना एक दर्जेदार उद्यान विकसित करण्यासाठी विशेष अनुदान देण्यात येत आहे. त्याअंतर्गत येवला नगरपालिका क्षेत्रात नमो उद्यान विकसित करण्यात यावे यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचा पाठपुरावा सुरू होता.
त्यानुसार शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून नमो उद्यानाला मंजुरी मिळाली असून यासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

यामुळे येवल्यातील नागरिकांना दर्जेदार उद्यान, हरित परिसर, विश्रांतीसाठी तसेच फिरण्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध होतील.
हे प्रकल्प येवला शहरातील नागरिकांसाठी हरित वातावरण, आरोग्यदायी जीवनशैली व मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी, लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, वेगवान मराठी नेटवर्कचे येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम, शेती, उद्योग, खेळ, बीजनेस आदी विषय सखोल माहिती , व लेखनाची आवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!