ई-पिक पाहणी तुम्ही केली कि नाही..आता उरले फक्त आठ दिवस तालुक्यात लखमापुर अव्वल

खरीप हंगामातील ई – पीक करण्यासाठी उरले अवघे आठ दिवस, तालुक्यातील लखमापूर ई – पीक पाहणी मध्ये अव्वल
वेगवान नाशिक/तुषार रौंदळ
सटाणा दि.22सप्टेंबर2025:-
खरीप हंगामातील ई – पीक पाहणी राज्यस्तरावर १ ऑगस्ट पासून सुरुवात करण्यात आली होती. शेतकरी स्तरावर ई – पीक पाहणी करण्याची मुदत सुरुवातीला १५ सप्टेंबर अशी होती. परंतु, शासनाने शेतकरी स्तरावरील पीक पाहणी कमी असल्याने पहिले ५ दिवसाची २० सप्टेंबर पर्यंत पहिली मुदतवाढ देण्यात आली होती. तरीही शेतकरी स्तरावरील पीक पाहणी ची प्रगती होत नसल्याने शासनाने पीक पाहणी करण्याची पुन्हा दुसर्यादा मुदत वाढ देत आता ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली असून आता फक्त खरीप हंगामातील ई – पीक करण्यासाठी उरले अवघे ८ दिवस शिल्लक राहिलेले आहेत. त्यानंतर ज्या शेतकऱ्याची पीक पाहणी करण्याची राहिलेली असल्यास त्यांना सहाय्यक स्तरावर पीक पाहणी करावी लागणार आहेत.
तालुक्यातील १७२ गावांपैकी तालुक्यातील लखमापूर १६८५ हेक्टर आर सारख्या मोठ्या गावात ई – पीक पाहणी ११०० हेक्टर. आर च्या वर शेतकरी स्तरावरील झाल्याने बागलाण तालुक्यात लखमापुर गाव पीक पाहणी करण्यामध्ये प्रथम स्थानी आहेत. बागलाण तालुक्यातील एकूण शेतकरी संख्या ११४३४७ पैकी आतापर्यंत ४२३०६ शेतकरी बांधावानी मोबाईल द्वारे पीक पाहणी केलेली असून एकूण पीक पाहणी ३८५१३ हेक्टर आर इतक्या क्षेत्रावर पीक पाहणी झालेली आहेत. अध्यापही बागलाण तालुक्यातील ७२०४१ इतक्या शेतकऱ्याची पीक पाहणी करणे बाकी आहेत. राज्याच्या अतिशय महत्त्वकांक्षी असलेल्या ई – पीक पाहणी प्रकल्पमुळे कोणत्या जिल्ह्यात किती क्षेत्रावर कोणते व किती क्षेत्रावर पीक लागवड केलेली आहे. याची माहिती शासनाला सहजरीत्या मिळते. शेतकऱ्यांना शासनाकडून अथवा पिकाला योग्य हमीभाव देण्यासाठी त्याच बरोबर शासनाच्या वेगवेगळ्या सुविधा मिळवण्यासाठी शासनाकडून पीक पाहणी करणं बंधनकारक केलेली आहेत. लखमापूर गावातील ग्राम महसूल अधिकारी दीपक मोठे यांनी केलेल्या कामाबद्दल तहसीलदार कैलास चावडे यांनी देखील कौतुक केले. त्याचबरोबर पुढील ८ दिवसात बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी पीक पाहणी करण्याचे आवाहन केले आहेत. मोठे तात्या यांनी ई – पीक पाहणी करण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बाधावर जात पीक पाहणी करण्याचे आवाहन करीत आहेत. तर मोठे तात्या यांनी शेतकऱ्यांना केलेल्या आवाहना प्रतिसाद दिल्याने शक्य झाल्याची प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्र शासनाच्या अत्यंत महत्त्वपूर्वक योजनेची माहिती थेट शेतकऱ्यापर्यंत पोहचविण्यासाठी मोठे तलाठी यांनी यापूर्वी देखील शेतकऱ्यानां ई – पीक पाहणी आणि किसान कार्ड तयार करण्यासाठी चित्रीकरणाचा व्हिडिओ बनविला असल्याने महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यानां या व्हिडिओ मुळे ई – पीक पाहणी करण्यासाठी मदत होत आहेत.
प्रतिक्रिया
… शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी केल्यास शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढील अडचण निर्माण होत नाही तसेच शासकीय अधिकाऱ्यांची गरजही भासत नाही शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणीची सवय लावून घेतली पाहिजे.
कैलास चावडे, तहसीलदार सटाणा.



