निफाड तालुक्यातील या ठिकाणी बिबट्या आढळला मृतावस्थेत…

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दिनांक १ डिसेंबर २०२५ :- नाशिक – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील गणेश मंगल कार्यालयाजवळील चंद्रकांत जाधव यांच्या शेतात आज संध्याकाळी एक बिबट्या मृतावस्थेत आढळला. या घटनेची माहिती पोलिस पाटील विलास चौधरी यांनी तात्काळ
वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनरक्षक विंचूर विजय दोंदे, माजी सैनिक अंकुश गुंड, आधुनिक बचाव पथक निफाड सागर दुसिंग, भारत माळी, विजय माळी, सादिक शेख, वैभव दौंड, शरद चांदोरे, मयुर गांगुर्डे समाधान चव्हाण यांनी तातडीने धाव घेत मृत बिबट्याला ताब्यात घेतले.
वनविभागाच्या प्रारंभिक तपासानुसार, सदर बिबट्याचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाला असावा. शव विघटन झाल्याचे आणि प्राण्याला किडे लागलेले असल्याचेही दिसून आले. नैसर्गिक मृत्यू किंवा बिबट्यांमधील संघर्षातून मृत्यू झाल्याची शक्यता प्राथमिक तपासात व्यक्त करण्यात आली आहे. शवविच्छेदन केल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे वनरक्षक विजय दोंदे यांनी सांगितले.



