साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील वनोली जवळ झालेल्या भीषण अपघात, युवकाचा मृत्यू, परिसरात हळहळ व्यक्त

वेगवान नाशिक/तुषार रौंदळ
विरगाव दि. ४ऑगस्ट२०२५ :- बागलाण तालुक्यातील साक्री – शिर्डी महामार्गवरील वनोली गावा जवळ रविवार (दि.३)रोजी मोटारसायकल व आयशर ट्रक यांच्यात भीषण अपघात होऊन रोहिदास मेलदास सोनवणे (वय ४३) राहणार (वारसा तालुका. साक्री ,जिल्हा धुळे )यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत असुन मयत तरुणावर त्याचा मुळ गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
वनोली येथून काम आटोपून आपल्या होंडा फॅशन या मोटरसायकलने भंडारपाडे येथे परत जात असताना सटाणा कडून सुरत कडे जाणाऱ्या आयशरने ट्रकने जोरदार धडक दिली .या धडकेत रोहिदास याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली होती.
या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी रोहिदास याला तात्काळ प्रथम सटाणा येथिल एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डोक्याला जबर मार लागल्याने त्याला तातडीने खाजगी अत्याधुनिक रुग्णवाहिका द्वारे नाशिक येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी जखमीस तपासून मृत घोषित केले.
सदर मयत तरुण हा वनोली येथील नाफेड खरेदी केंद्रावर वाँचमेन म्हणून मागिल एक वर्षांपासून काम करीत होता. अतिशय गरीब व मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने परिसरातील हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान आज मयत तरुणावर त्याचा मुळ गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले या वेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.



