शेती
दिंडोरीः अशी खुन्नस की मका पिकाचे केले नुकसान

वेगवान नाशिक/ सागर मोर
दिंडोरी:वरखेडा येथे अज्ञात व्यक्तीकडून मका पिकाचे नुकसान केल्याप्रकरणी वणी पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरखेडा येथील मुक्ताबाई भाऊसाहेब नवले यांचे शेत गट नं. 145 मध्ये मका पिक लागवड केली होती
मकाची पाहणी करण्यासाठी मुक्ताबाई नवले गेल्या असता त्यांना कुणीतरी अज्ञात व्यक्तीने मका पिक उपटून टाकून नुकसान केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबत वणी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात मका पिकाचे नुकसान केल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली.
यावेळी वणी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलिस करीत आहे.



