नाशिक ग्रामीण

नांदगांव मनमाड येथी लहान मोठ्य चोरी सत्र

Nandgaon

मनमाड शहर आणि नांदगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील चोरी सत्र सुरू !
वेगवान मराठी ( दि 4 ऑगस्ट ) : मारुती जगधने नांदगाव तालुक्यातील मनमाड शहर आणि तालुक्यातील पळाशी या गावी अज्ञात चोरट्याने चोरी करून रोख रकमेसह मौल्यां वस्तू चोरी केले आहे या घटनेची नांदगाव आणि मनमाड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे . तपास नांदगाव आणि मनमाड येथील पोलीस करीत आहे तालुक्यातील वाढत्या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे चोरट्यांना लवकर जेलबंद करावे अशी मागणी नागरिक करत आहे .
नांदगाव तालुक्यातील पळाशी या गावी अज्ञात चोरट्यांनी घराचे कडी कोयंडे तोडून दोन लाख 24 हजार रुपये किमतीचा रोख रकमेस ह  मौल्यवान वस्तू घेऊन पसार झाले .
 या घटनेची नांदगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या नांदगाव शहर आणि तालुक्यामध्ये लहान मोठ्या चोरीच्या घटना सातत्याने होत आहे यावर आळा बसाव यासाठी नागरिक मागणी करतात .
पळाशी या घटनेतील फिर्यादी विलास शिवाजी आव्हाड राहणार पळाशी तालुका नांदगाव या नी फिर्यादीत म्हटले की दिनांक 2025 रोजी रात्री अकरा वाजता ते दिनांक 3 / 8/ 25 रोजी सकाळी नऊ वाजता या दरम्यान त्यांचे घरी बाजूचे रूममध्ये फिर्यादी झोपलेले असताना  कोणीतरी अज्ञात चोरट्याने रात्री त्यांचे घराचे दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून लोखंडी कपाटाचे लॉक तोडून लबाडीच्या इराद्याने एकूण किंमत दोन लाख 24 हजार रुपये मुद्देमाल चोरी करून पसार झाले .
 याबाबत घटनेचा तपास पोलीस निरीक्षक भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे करीत आहे या घटनेत अज्ञात चोरट्याने चोरी केल्याने घटनेतील चोरांचा नांदगाव ग्रामीण पोलीस तपास घेत आहे .
मनमाड येथील चोरी
: मनमाड तालुका नांदगाव येथील के के मेडिकल अँड जनरल स्टोअर्स मधून दुकानाचे शटर उचकून अज्ञात चोरट्याने पाचशे रुपये रोख रक्कम चोरून नेले ही घटना दिनांक दोन आठ पंचवीस रोजी घडली नगीना कॉम्प्लेक्स जयश्री टॉकीज शेजारी मनमाड येवला रोड मनमाड तालुका नांदगाव येथे घडली .
नांदगाव शहर आणि मनमाड शहर व तालुक्यामध्ये अधून मधून चोरीच्या घटना घडत आहे या घटनांना परिपूर्ण आळा बसण्यासाठी पोलिसांनी घटनेचा तपास लावून चोरांना जेरबंद करावे अशी मागणी होत आहे .
दरम्यान नागरिकांनी देखील आपल्या जीवनावश्यक वस्तू मौल्यवान वस्तू यांची हिफाजत योग्य पद्धतीने करावी आणि चोरी होणार नाही यासाठी आपल्या मौल्यवान वस्तू सुरक्षित स्थळी ठेवाव्यातसेच गावात परिसरात कोणी संशयित व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांना संपर्क करावा असे आवाहन पोलीस युवा कडून केलेले आहे .
 फिर्यादीचे मालकीचे केके मेडिकल अँड जनरल स्टोअर्स नावाचे मेडिकल दुकानाच्या शटर चे कुलूप तोडून दुकानात प्रवेश करून दुकानातील ड्रायव्हर मधील रोख रक्कम चोरून पसार झाले घटनेचा तपास अमलदार शिंदे करीत आहे या घटनेची मनमाड पोलिसात गुन्ह्याची नोंद झालेली आहे चेतन कांतीलाल चोरडिया यांनी या घटनेची मनमाड पोलिसात तक्रार दाखल केली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!