नाशिक ग्रामीण

शालकांनी दाजी रस्त्यात बदडला

वेगवान नेटवर्क / मारुती जगधने

नांदगाव, ता. 29 जुलै 2024-

नांदगाव तालुक्यातील पोखरी म्हसबो बारीत दोघा भावांनी दाजीबाला रस्त्यात धोपट ले या वादातून दाजीबाला गंभीर स्वरूपाची मारहाण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघा शालकाने (बायकोच्या भावाने) आपल्या दाजीबाला (बहिणीच्या नवऱ्याला) वैयक्तिक वादाच्या पार्श्वभूमीवर मारहाण केली.

ही घटना दि 28जुलै रोजी घडली. सांगितले जाते की, घरगुती कारणावरून दोघां तिघा मध्ये वाद उफाळून आला होता. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि शालकाने दाजीबाला लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांड्याने जबर मारहाण केली. यात दाजीबाला गंभीर जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून शालकाविरोधात कलम 118 ( एक ) 115 ( दोना ) 35 1 (2 ) ( 3 ) 352 प्रमाणे अंतर्गत कारवाई सुरू आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून शालकाविरोधात कलम 118 ( एक ) 115 ( दोना ) 35 1 (2 ) ( 3 ) 352 प्रमाणे अंतर्गत कारवाई सुरू आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

दिनांक 28 /7 / 2025 रोजी यातील संशयित आरोपी यांनी फिर्यादी सागर पुंजाराम तांबे वय वर्ष 23 व्यवसाय राहणार तांबेवाडी नांदगाव यास ला थाबुक्यांनी जो रात मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली या घटनेमध्ये दोन साल्याने दाजीला फटकारले ची घटना घडली

यामुळे दोघांवर ती गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयित आरोपी समाधान सिताराम बोरकर व चुडामन सिताराम बोरकर दोघे राहणार क्रांतीनगर नांदगाव या दोघांवर गुन्हा दाखल झालाय

जुन्या भांडणाची पूर्वत काढून फिर्यादी व आरोपी हे नात्याने साले मेहुणे असून यातील फिर्यादी व त्याची पत्नी या दोघांमध्ये दोन दिवसापूर्वी किरकोळ स्वरूपाचे भांडण झाल्याने पत्नी तिच्या माहेरी निघून गेल्याने यातील संशयित आरोपी एक व दोन हे फिर्यादीजवळ येऊन फिर्यादीत थांबून म्हणाले की तुम्ही आमच्या बहिणीबरोबर भांडण का केले तुम्ही आमच्या सोबत चला अशी कुरपत काढून संशयित आरोपी एक व दोन यांनी फिर्यादी स शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण करून संशयित आरोपी दोन याने बाजूला पडलेले लाकडी काठी हातात उचलून फिर्यादीच्या पाठीवर हातावर दोन्ही पायावर मारून दुःखद करून संशयित आरोपी एक व दोन यांनी जीवे ठार मारण्याचा दम दिला म्हणून गुन्हा दाखल.

नांदगाव पोलीस घटनेचा तपास घेत आहे सदरची घटना नांदगाव चाळीसगाव नॅशनल हायवे वरील पोखरी म्हसोबा बारीतमध्ये घडली या घटनेमध्ये दोघ शालकाने दाजीला फटकारले म्हणजे मारले या घटनेने खळबळ उडाली आहे .

वेगवान डिजीटल टीम

वेगवान डिजीटल टीम ही वेगवान कार्यालयातील उपसंपादक लोक हे वेगवान नाशिकच्या अधिकृत पॅनलवरुन बातमी चालवत असतात. सदर बातमी ही वेगवान मधील प्रमुख लोक चालवत असतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!