नाशिक ग्रामीण

रोटरी क्लब देवळा टाउनच्या वतीने “नेशन बिल्डर अवार्डने” गुणवंत शिक्षकांचा गौरव

देवळा प्रतिनिधी

शिक्षकांची स्पर्धा स्वतःशीच असल्याने शिक्षक जेवढे चांगले प्रयत्न करतील तेवढे त्यांचे विद्यार्थी चांगले घडतील असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील अॅड शिशिर हिरे यांनी देवळा रोटरी क्लबच्या वतीने नेशन बिल्डर अवार्ड वितरण प्रसंगी केले.

रोटरी क्लब ऑफ देवळा टाऊन यांच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त देवळा तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात समाजाभिमुख कार्य करणाऱ्या शिक्षकांना नेशन बिल्डर अवार्ड देऊन गौरविण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी शिवनिच्यल ट्रस्टचे अध्यक्ष शिवव्याख्याते प्रा यशवंत गोसावी, उपप्रांतपाल अरुण पवार, प्रियांका बागड, अध्यक्ष सुनिल आहेर, सेक्रेटरी दिनकर देवरे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्ष सुनिल आहेर यांनी प्रास्ताविक केले. यशवंत गोसावी यांनी आपण ज्या क्षेत्रात असाल त्या ठिकाणी आपल सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा असे आवाहन शिक्षकांना केले.

प्रा डॉ. जयमाला चंद्रात्रे, प्रा शशिकांत निकम, एस के आहेर, पुनम पाटील, हर्षाली अहिरराव, पोपट विश्वास, मुरलीधर भामरे, सुजितकुमार अहिरराव, जमनादास अहिरराव, हरणगाव ता पेठ येथील धनंजय चव्हाण, ठाणगाव ता सुरगाणा येथील मनोज वैद्य, प्राथमिक शाळा बहादूरी ता चांदवड येथील शिक्षिका जयश्री शेवाळे, श्याम पाटील आदि शिक्षकांचा या प्रसंगी गौरव करण्यात आला. पुरस्कार्थी शिक्षक मुरलीधर भामरे, जयश्री शेवाळे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

या प्रसंगी रोटरी क्लबचे सद्ष्य डॉ व्ही एम निकम, डॉ वसंत आहेर, कौतिक पवार, प्रितेश ठक्कर, सुनील देवरे, एस टी पाटील, संदीप पगार, संजीव आहेर, कैलास बागुल, अॅड रितेश निकम, खंडू मोरे, मोहनदासम गवळी यांसह तालुक्यातील शिक्षक यावेळी उपस्थित होते. भगवान आहेर यांनी सूत्रसंचलन केले तर एस टी पाटीलसर यांनी आभार व्यक्त केले.

मनोज वैद्य

✍️पत्रकारिता क्षेत्रात मागील २१ वर्षांपासून कार्यरत असून प्रारंभी देशदुत, नंतर युवा सकाळ, पुण्यनगरी, लोकमत या नामवंत दैनिकातून परिसरातील सामाजिक, राजकीय, शेतीविषयक तसेच युवा वर्गांला मार्गदर्शक ठरेल असे लिखाण, नंतरच्या काळात ऑनलाईन बातमीदारीत पब्लिक ॲप दिल्ली, वेगवान न्यूज चॅनल च्या माध्यमातून पत्रकारिता सुरूच....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!