मातोश्री कमल फाऊंडेशनतर्फे गुणवंतांचा गौरव

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : तालुक्यातील वाजगाव येथील मातोश्री कमल फाऊंडेशन आणि विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत व श्रमवंत विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव सोहळा दिनांक ३ ऑगस्ट रोजी कन्यादान लॉन्स, देवळा येथे उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात आयकर अधिकारी कु. आकाश बोढारे, पोलीस अधिकारी बापूसाहेब देवरे, समाधान येशीकर, कु. सानिका केदारे, कु. सुशिलकुमार शिंदे, कु. साहील यादवराव जाधव, प्राचार्य नंदु गवळी आदी मान्यवरांना भारतीय संविधान, उद्देशिका, संस्थेचे प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. हे पुरस्कार माजी महसूल उपआयुक्त बी. जी. वाघ यांच्या हस्ते देण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. जी. एल. वाघ होते.
कार्यक्रमात चि. सम्यक सोपान लहिरे याने आपल्या कवितेतून आजींना श्रद्धांजली अर्पण केल्याने वातावरण भावनिक झाले होते. या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाध्यक्ष नितीन आहेर, उपनराध्यक्ष संजय आहेर, डॉ. सुरेश कांबळे, कादवा संचालक सुकदेव जाधव, नगरसेवक कैलास पवार, सरपंच निवृत्ती घाटे, विनोद देवरे, प्रविण केदारे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात डॉ. कांबळे यांनी संस्थेला रोख रक्कम देणगी दिली, तर विविध सामाजिक व शिक्षक संघटनांनी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. धम्मविधी भंते बोधीपाल (अहिरे गुरुजी) यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनील बागुल तर प्रास्ताविक प्रा. जितेश पगारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सोपान लहिरे, योगेश केदारे, संदीप केदारे आणि पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.