अबब! या ठिकाणी चक्क शेतातील उसाची चोरी….

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दि.२ ऑक्टो २०२५ :- शेतात उभा असलेला सुमारे ५० हजार रुपये किमतीचा ऊस रात्रीच्या सुमारास चोरीला गेल्याची धक्कादायक घटना निफाड तालुक्यातील काथरगाव येथे उघडकीस आली आहे.
मच्छिद्र प्रभाकर वाघ (वय ५०, धंदा शेती, रा. काथरगाव, ता. निफाड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.२७ सप्टें २०२५ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या गट क्र.३२० मधील १ हेक्टर ४० आर क्षेत्रातील ऊस शेतातून, अंदाजे ५० हजार रुपयांचा ऊस आरोपी हेमंत मंगेश केदार, रा.काथरगाव याने फिर्यादीच्या परवानगीशिवाय स्वत:च्या फायद्यासाठी लाबाडीने चोरून नेला असे म्हटले आहे.
याप्रकरणी निफाड पोलीस ठाण्यात गु.र.नं.३२२/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि.गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा. सोनवणे करीत आहेत.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या मते ऊसासारखे दीर्घकालीन पिक शेतकऱ्यांनी महिनोन्महिने कष्ट करून उभे केलेले असते. मात्र त्याची अशी उघड चोरी होऊ लागल्याने आता शेतातील ऊस देखील सुरक्षित राहिला नाही, ही मोठी चिंतेची बाब असल्याचे बोलले जात आहे.



