वेगवान मराठी : मारुती जगधने
नांदगाव : [दिनांक 25 ऑगस्ट 2025 ] नांदगाव-मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील हिसवळ बुद्रुक शास्त्री नगर फाट्याजवळ सोमवारी दुपारी च्या सुमारास दोन मोटरसायकलचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून आणखी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने उपचारासाठी हलवण्यात आले होते मात्र त्यांची प्रकृती देखील गंभीरअसल्याचे कळते .
अपघात इतका जोरदार होता की दोन्ही दुचाकींचा पूर्णतः चक्काचूर झाला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना रुग्णालयात हलवले. गंभीर जखमींवर मनमाड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी अतीवेग आणि बेपर्वा वाहनचालक यामुळे ही दुर्घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच नांदगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे.
सदर घटनेमध्ये दिगंबर अहिरे [ वय 35 ]राहणार जळगाव बुद्रुक तालुका नांदगाव व त्यांच्या सोबत असलेले सुदाम सानप राहणार जळगाव बुद्रुक हे गंभीर जखमी झाले .
याच प्रसंगी या दोन मोटरसायकल भरदा वेगाने समोरासमोर एकमेकाला धडकल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येते ? या घटनेमध्ये दुसऱ्या मोटरसायकल वरील दोघेजन हे पानेवाडी तालुका नांदगाव येथील रहिवासी असल्याचे कळते त्यातील एक गंभीर आणि एकाचा मृत्यू झालाय
या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



