नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

सर्वपक्षीय शोकसभा; जिव्हाळ्याच्या नेतृत्वाला अश्रूंनी निरोप

Nandgaon News

नांदगाव तालुक्यात सर्वपक्षीय शोकसभा; जिव्हाळ्याच्या नेतृत्वाला अश्रूंनी निरोप
वेगवान मराठी : मारुती जगधने
नांदगाव दिः 31 जानेवारी 2026
नांदगाव तालुक्यातील गुप्ता लॉन्स येथे शिवसेनेच्या वतीने सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले. या शोकसभेत विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते पत्रकार तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या मनात एकच भावना होती—कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणाऱ्या, माणुसकी जपणाऱ्या नेतृत्वाच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी.
शोकसभे दरम्यान उपस्थित वक्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना त्या नेत्याच्या आठवणींना उजाळा दिला. “गालावरून मायेने हात फिरवत ‘कसा आहेस, काळजी घे’ असे विचारणारा, ताफा थांबवून सामान्य कार्यकर्त्याच्या घरी जाऊन कुटुंबीयांची चौकशी करणारा, लहान मुलाच्या हातात चॉकलेट देत ‘गोड पापा घे’ म्हणणारा नेता आज दुर्मीळ आहे,” अशा शब्दांत आमदार सुहास कांदे यांनी भावना व्यक्त केल्या.
चूक असल्यास स्पष्टपणे ‘ही चूक आहे’ असे ठाम सांगणारे, मात्र त्यानंतर प्रेमाने समजावून घेणारे आणि अडचणीच्या काळात “थेट फोन कर” असे सांगून कार्यकर्त्याला मानसिक बळ देणारे नेतृत्व आजच्या राजकारणात क्वचितच पाहायला मिळते, असे मतही वक्त्यांनी मांडले. त्यामुळे ही शोकसभा केवळ औपचारिक न राहता, आठवणींनी भरलेली आणि भावनिक बनली होती.
या सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन शिवसेना आमदार सुहास कांदे व अंजुम कांदे यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. यावेळी शिवसेना ,राष्ट्रवादी, कॉग्रेस , मनसे, पवार गट, ठाकरे गट, आम आदमी पक्ष , आर पी आय गट,
काँग्रेससह विविध पक्षांचे पदाधिकारी, स्थानिक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येत जड अंतःकरणाने श्रद्धांजली अर्पण केली.
आमदार सुहास कांदे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “दूरदृष्टी असलेला, शब्दाचा पक्का, शिस्तप्रिय आणि कधी कठोर वाटणारा; पण मनाने अत्यंत आपुलकीने जवळ करणारा असा नेता मी माझ्या राजकीय प्रवासात फार कमी पाहिला आहे.” त्यांनी पुढे नमूद केले की, अशा नेतृत्वाच्या जाण्यामुळे राज्याचे मोठे नुकसान झाले असून, अशी व्यक्ती पुन्हा होणे कठीण आहे.
शोकसभेच्या अखेरीस उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून दिवंगत नेत्यास श्रद्धांजली अर्पण केली. संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण होते. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू होते, तर अनेकजण आठवणी सांगताना भावूक झाले. तर काहींनी कविता व्यक्त करून श्रद्धांतली दिली कार्यकर्ताकेंद्रित, माणुसकी जपणाऱ्या नेतृत्वाच्या स्मृती कायम राहतील, अशा भावना व्यक्त करत उपस्थितांनी सभेची सांगता केली. या प्रसंगी माजी आमदार संजय पवार, माजी आमदार अनिल आहेर,नगराध्यक्ष सागर हिरे, नगराध्यक्ष योगेश पाटील, म वी प्र चे संचालक अमित पाटील, ,फरान दादा , विजय पाटील , संतोष गुप्ता , दत्तराज छाजेड ,मधुकर गिते ,भाऊसाहेब महाजन, संजय सानप  नांदगाव मनमाड येथील नगरसेवक पंचायत समितीचे आजी-माजी सदस्य विविध ग्रामपंचायतचे सरपंच नांदगाव मनमाड बाजार समितीचे संचालक ग्रामपंचायत सदस्य सरपंच नागरिक व्यापारी , आजी माजी नगरसेवक विविध संघटनांचे पदाधिकारी शिवसेनेचे  व विविध पक्ष
पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्याने हजर होते . याप्रसंगी अजीत दादा पवार यांच्या विविध बोलक्या मुद्रा  स्टेजवर लावण्यात आल्या  होत्या .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!