नाशिकः अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या, कांदा पिक धोक्यात

वेगवान नाशिक / साहेबराव ठाकरे
नाशिक जिल्ह्यात हवामानाने अचानक कूस बदलली असून, २६ जानेवारीच्या रात्री चांदवड तालुक्यासह परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रात्री ९ वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली असून काढणीला आलेल्या कांदा पिकाला मोठा फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत.
नाशिक जिल्ह्यात हवामानाने अचानक कूस बदलली असून, २६ जानेवारीच्या रात्री चांदवड तालुक्यासह परिसरात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या आहे. रात्री ९ वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली असून काढणीला आलेल्या कांदा पिकाला मोठा फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत.
चांदवड तालुक्यातील काजी सांगवी परिसरातील लासलगाव रस्त्यावर रात्रीच्या वेळी पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतात कापून ठेवलेला कांदा सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. अनेक शेतकरी रात्रीच्या अंधारात कागद (प्लास्टिक) टाकून कांदा झाकण्यासाठी धडपड करताना दिसत होते.
कांदा पिकाला मोठा धोका सध्या नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी कांदा काढणीचा हंगाम सुरू आहे. मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा शेतात कापून पडला असतानाच निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. जर पावसाचा जोर असाच कायम राहिला, तर लासलगाव बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणलेला आणि ट्रॅक्टरमध्ये उघड्यावर असलेला कांदाही भिजण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शेतकरी आपली पिके वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. “आज २६ जानेवारी आहे आणि अचानक आलेल्या या पावसाने आमची सगळी लगभग उडवून दिली आहे,” अशी भावना स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील काही तास जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांनी आपल्या मालाची योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांची उडाली तारांबळ व्हिडिओमधील माहितीनुसार, चांदवड तालुक्यातील काजी सांगवी परिसरातील लासलगाव रस्त्यावर रात्रीच्या वेळी पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतात कापून ठेवलेला कांदा सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. अनेक शेतकरी रात्रीच्या अंधारात कागद (प्लास्टिक) टाकून कांदा झाकण्यासाठी धडपड करताना दिसत होते.