विंचूर – थेटाळे रस्त्यावरील जंगल परिसरात रात्री बंद पडलेली मारुती सुझुकी सिलेरिओ कार अज्ञात चोरट्यांनी नेली चोरून .

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद ता.२१ जाने २०२६ :- विंचूर – थेटाळे रस्त्यावरील जंगल परिसरात रात्री बंद पडलेली मारुती सुझुकी सिलेरिओ कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.
याबाबत रुषिकेश शांताराम शिरसागर रा.शिवडी, ता.निफाड, यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.१८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ते आपली मारुती सुझुकी सिलेरिओ कार क्र.एम.एच.०५ डी.एच.६०५६ घेऊन विंचूर येथे मामास भेटण्यासाठी गेले होते. रात्री सुमारे ९ वाजता विंचूर – थेटाळे मार्गे शिवडीकडे परत येत असताना जंगल परिसरात अचानक कार बंद पडली. त्यावेळी त्यांनी कार तपासून पाहिली; मात्र ती सुरू न झाल्याने रस्त्याने जाणाऱ्या मोटारसायकलस्वाराच्या मदतीने कार रस्त्याच्या कडेला उभी केली. परिसरात कोणतेही दुरुस्ती दुकान नसल्याने त्यांनी वडिलांच्या सूचनेनुसार कार तेथेच उभी ठेवून घरी परतले. दुसऱ्या दिवशी दि.१९ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजता ते मॅकेनिकसह कार उभी केलेल्या ठिकाणी गेले असता सदर कार तेथे आढळून आली नाही. आजूबाजूच्या परिसरात तसेच विंचूर, लासलगाव, निफाड, नैताळे, शिवडी, येवला, चांदवड व नाशिक भागात शोध घेऊनही कार मिळून आली नाही. चोरीस गेलेली कार सुमारे ८० हजार रुपये किमतीची असून या प्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स.पो. नि.भास्करराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली यांचे मार्गदर्शनाखाली पो.हवा.बाळासाहेब कांदळकर अधिक तपास करीत आहेत.



