महाराष्ट्र,देश

येवल्या च्या भूमिपुत्राचा पुणे महानगर पालिकेवर झेंडा…

येवल्या च्या भूमिपुत्राचा पुणे महानगर पालिकेवर झेंडा...

वेगवान मराठी /एकनाथ भालेराव

येवला दिनांक 21जानेवारी 2026 :-येवला तालुक्यातील दुर्गम भागातील युवक पुण्या सारख्या शहरात जाऊन आपला राजकीय जम बसवतो, इतकेच नव्हे तर 2004 पासून सातत्याने पुणे महानगर पालिकेवर निवडून येतो…

पन्हाळसाठे तालूका येवला येथील भुमिपुत्र असलेले दत्ता खाडे स्वतः 2004 ला नगरसेवक झाले. पत्नी निलिमा खाडे याही 2016 ला नगरसेविका झाल्या.
पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या शिवाजीनगर, डेक्कन जिमखाना, मॉडेल कॉलनी या परिसरात आपल्याला कार्य कर्तृत्वाने आणि भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याने आता पुढच्या पिढीतील अपुर्व खाडे यांनी मॉडेल कॉलनी प्रभागा मधून मोठा विजय मिळवला आहे.

पुण्यात व्यावसायिक आणि राजकीय कारकीर्द घडली असली तरी खाडे कुटुंब आपल्या पन्हाळसाठे गावाला विसरले नाहीत. वेळोवेळी गावात विविध विकास कामासाठी त्यांनी भरीव योगदान दिले आहे. गावातून अपूर्व खाडे त्यांच्या निवडीबद्दल आनंद साजरा केला आहे.

एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी, लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, वेगवान मराठी नेटवर्कचे येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम, शेती, उद्योग, खेळ, बीजनेस आदी विषय सखोल माहिती , व लेखनाची आवड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!