नाशिक ग्रामीण

निफाड तालुक्यात वाढत्या थंडीचा पहिला बळी; बावीस वर्षीय युवकाचा थंडीने काकडून दुर्दैवी मृत्यू

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद, दि.९ जानेवारी :- निफाड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी घट होत असून कडाक्याच्या थंडीचा फटका नागरिकांना बसत आहे. या वाढत्या थंडीमुळे यावर्षीचा पहिला दुर्दैवी मृत्यू नोंदला गेला असून देवगाव (ता. निफाड) येथील २२ वर्षीय युवकाचा थंडीत काकडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

देवगाव येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाजवळ आज शुक्रवार दि.९ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास समीर दौलत सोनवणे (वय २२) हा युवक मृतावस्थेत आढळून आला. पोलिस पाटील सुनिल बोचरे यांनी लासलगाव पोलिसांना तात्काळ खबर दिली. माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्करराव शिंदे, पोलीस हवालदार संदीप शिंदे व औदुंबर मुरडनर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी लासलगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदन प्राथमिक अहवालानुसार अति थंडीमुळे हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने युवकाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात गु.र.नं. ०१/२०२६ भा. न्या.संहिता कलम १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेषतः रात्रीच्या वेळी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी केले आहे.

 

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!