नाशिक ग्रामीण

शिरवाडे येथील युवकाच्या मृत्यूस कारणीभूत पिकअप चालकाविरुद्ध सायखेडा पोलिसांत गुन्हा दाखल

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद,दिनांक ७ जानेवारी २०२५ :- रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत हयगईने व भरधाव वेगात वाहन चालवून शिरवाडे येथील युवकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पिकअप चालकाविरुद्ध सायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी रोहीत हनुमंत सोनवणे (वय २०, व्यवसाय – विटभट्टी कामगार, रा.शिरवाडे वाकद, ह.मु.कोठुरे) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.१४ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजेचा सुमारास चांदोरी शिवारातील खर्जुल भारत पेट्रोल पंपासमोर छत्रपती संभाजीनगर ते नाशिक महामार्गावर आरोपी विलास बंडू बोरस्ते, रा.चांदोरी हा आपल्या ताब्यातील पिकअप वाहन (क्र. एम.एच.१५, एच.एच.१९६१) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून हयगईने व अविचाराने भरधाव वेगात चालवत होता. त्याने दुभाजकाच्या मधील मोकळ्या जागेतून अचानक रस्त्याच्या बाजूला असलेल्या खर्जुल भारत पेट्रोल पंपाकडे वळण घेत रस्त्यावर आडवी गाडी आणली. त्यामुळे निफाडकडून नाशिककडे येणारी हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल (क्र.एम.एच.१५ के.पी.६८५८) पिकअपच्या किन्नर साईड मागील टायरजवळ जोरात आदळली. या अपघातात मोटारसायकल चालक गणेश सतिष निकम (वय १८) रा.शिरवाडे वाकद याला डोके, डावा खांदा व डाव्या पायाला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. मोटारसायकलवर मागे बसलेला फिर्यादी रोहीत हनुमंत सोनवणे याला डाव्या पायाच्या मांडीला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातात मोटारसायकलचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यांच्या फिर्यादीवरून सायखेडा पोलिस ठाण्यात गु.र.नं.०६/२०२६ भा.न्या.सं. कलम १०६(१),२८१,१२५(अ), १२५(ब), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हवा. गायकवाड करीत आहेत.

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!