नाशिक ग्रामीण

या शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत; पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात पाच मुले गंभीर जखमी

Nandgaon news

या  शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत; पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात पाच मुले गंभीर जखमी
नांदगाव : मारुती जगधने
दिनांक 23 डिसेंबर २०२५
नांदगाव शहरात सध्या मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील मटन मार्केट परिसर, भाजीपाला बाजार, नदीपात्र तसेच कचरा टाकण्याच्या ठिकाणी फेकलेले अन्न व इतर अवशेष खाल्ल्यामुळे काही मोकाट कुत्रे आक्रमक व पिसाळलेली झाल्याचे चित्र आहे.
यातीलच एका पिसाळलेल्या कुत्र्याने शहरातील मोठी होळी, भावसार गल्ली, हिंगलाज माता मंदिर परिसर, चांडक प्लॉट व गांधी चौक या भागांमध्ये धुमाकूळ घालत लहान मुलांवर हल्ले केले. या घटनेत पाच लहान मुले गंभीर जखमी झाली असून त्यामध्ये एका मुलीचाही समावेश आहे. जखमी मुलांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.
या घटनेनंतर पालकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले असून मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी केली जात आहे. मागील दोन दिवसांपासून हे पिसाळलेले कुत्रे शहरातील विविध भागांमध्ये फिरत असून अनेक नागरिकांना त्यांनी चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे.दिनांक 23 डिसेंबर रोजी सकाळी चांडक प्लॉट परिसरात कुत्र्या ला जीवे मारल्याचीही घटना घडल्याचे कळते, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.या घटनेमध्ये नांदगाव पालिकेचे कर्मचारी देखील कुत्र्याच्या चाव्यात जखमी झाल्याचे कळते .
दरम्यान, चॉकलेटी रंगाच्या एका मोकाट कुत्रीने अवघ्या एका दिवसात पाच जणांना चावा घेतल्याची घटना घडली
 श्रीकृष्ण नगर, मोठी होळी, साने गुरुजी नगर, महावीर मार्ग, शनि मंदिर परिसर या भागांमध्ये तिचा वावर अधिक होता  अशी माहिती स्थानिकांनी दिली . तसेच श्रीकृष्ण नगरमध्ये एका मुलीला चावा घेतल्याची आणखी एक घटना समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर नांदगाव शहरातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, लहान मुलांना एकटे बाहेर पाठवू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच नगरपालिकेच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी तातडीने या मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा शोध घेऊन त्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
दरम्यान मोकाट कुत्र्यांची मोहीम पूर्ण सुरू करण्यात येईल यासाठी नागरिकांनी सहकार्य करावा अशी आव्हान पालिका  प्रशासन अधिकारी शामकांत जाधव यांनी केले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!