लोकल बातम्या

जीवे मारण्याच्या धमक्यांप्रकरणी पोलिसांकडे अधिकृत निवेदन

Nandgaon news

: जीवे मारण्याच्या धमक्यांप्रकरणी पोलिसांकडे अधिकृत निवेदन

वेगवान मराठी : मारुती जगधने

” दि 22 डिसेंबर 2025 ”
नांदगाव :
विश्व हिंदू परिषद–बजरंग दल (नांदगाव प्रखंड) तसेच सकल हिंदू समाज, नांदगाव तालुका यांच्या वतीने नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक यांना एक अधिकृत निवेदन सादर करण्यात आले आहे. हे निवेदन २२ डिसेंबर २०२५ रोजी देण्यात आले आहे.
या निवेदनामध्ये हर्षताई ठाकूर यांना सलमान शेख (रा. नांदेड) या व्यक्तीकडून सतत जीवे मारण्याच्या धमक्या तसेच सामाजिक बदनामी करण्याचे प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. निवेदनानुसार, आरोपीकडून फोन कॉल्स, संदेश (मेसेजेस) आणि इतर माध्यमांद्वारे वारंवार धमक्या दिल्या जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकारामुळे हर्षताई ठाकूर यांच्या जीवितास व मानसिक सुरक्षिततेस धोका निर्माण झाला असून, यामुळे नांदगाव तालुक्यातील हिंदू समाजामध्ये तीव्र अस्वस्थतेचे वातावरण असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
निवेदनात प्रशासनाला इशारा देण्यात आला असून, भविष्यात हर्षताई ठाकूर यांच्या जीवाला किंवा मालमत्तेला कोणतीही इजा झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित आरोपीसह प्रशासनावर राहील, असे नमूद करण्यात आले आहे.
प्रमुख मागण्या
या निवेदनाद्वारे पोलिसांकडे खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत—
संबंधित आरोपीविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल (FIR) करण्यात यावा.
आरोपी सलमान शेख याला त्वरित अटक करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
हर्षताई ठाकूर यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे.
या प्रकरणावर नांदगाव पोलिसांकडून पुढील काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!