Uncategorizedनाशिक ग्रामीण

नांदगाव नगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा; सागर हिरे नगराध्यक्षपदी विराजमान

Nandgaon news

नांदगाव नगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा; सागर हिरे नगराध्यक्षपदी विराजमान
वेगवान मराठी :  मारुती जगधने
दिनांक 21 डिसेंबर २०२५
नांदगाव नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर झाला असून या निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने दणदणीत यश संपादन केले आहे. शिवसेनेचे उमेदवार सागर मदनराव हिरे हे नगराध्यक्षपदासाठी निवडून आले असून, त्यांच्यासोबत आणखी 12 नगरसेवकांनी विजय मिळवला आहे.
यापूर्वीच शिवसेनेचे 7 नगरसेवक बिनविरोध निवडून आले होते, त्यामुळे एकूण 19 नगरसेवक शिवसेनेचे झाले आहेत. याशिवाय एक अपक्ष उमेदवारही निवडून आला आहे, त्यामुळे नगरपालिकेवर शिवसेनेचे स्पष्ट वर्चस्व निर्माण झाले आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून पक्षाला अपेक्षित यश मिळू शकले नाही. निवडणूक निकालातून मतदारांनी शिवसेनेच्या विकासात्मक धोरणांवर विश्वास व्यक्त केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, शिवसेना–भाजप युतीतून भाजपच्या वतीने निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवाराच्या संजय सानप जागेवर अपक्ष उमेदवार काशिनाथ देशमुख यांनी विजय मिळवला, हे या निवडणुकीतील एक महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले.
या निकालामुळे नांदगाव शहराच्या राजकारणात शिवसेनेची ताकद अधिक भक्कम झाली असून, आगामी काळात नगरपालिकेमार्फत विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.नांदगाव पालिकेच्या आजपर्यंतच्या इतिहासात मध्ये प्रथमच एका पक्षाचे 19 उमेदवार निवडून आल्याची एकमेव निवडणूक या वेळेला नागरिकांना बघायला मिळाले .राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेश बनकर यांना मोठा पराभव पत्करावा लागला .
नांदगाव नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या इतिहासामध्ये विरोधी पक्षाचा एकही नगरसेवक विजय झालेला नाही ही गोष्ट अत्यंत लक्षवेधी ठरली आहे .विरोधी पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसला व काँग्रेस यांचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही त्यांचे खाते खोलू शकले नाही .त्यामुळे नांदगाव नगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष उरलेला नाही .दिनांक 21 डिसेंबर रोजी नांदगाव पालिकेमध्ये निवडून आलेले नगरसेवक पदाचे उमेदवार खालील प्रमाणे
बाळासाहेब शेवरे
काका सोळशे
गायत्री शिंदे
कल्पना जगताप
पृथ्वीराज पाटील
 सादिक शेख
रूपाली पाटील
स्नेहल पाटील
वाल्मीक टिळेकर
विद्या कसबे
राखी जाधव
राजेश शिंदे सर्व शिवसेना  शिवसेना
काशिनाथ देशमुख (अपक्ष )
यापूर्वी नांदगाव पालिकेच्या निवडणूक प्रसंगी बिनविरोध निवडून आलेले खालील नगरसेवक
पांडव दीपक प्रमोद
नावंदर स्वाती अमोल
खरोटे योगिता सचिन
 कासलीवाल शोभा नेमीचंद
देवरे किरण जयप्रकाश
  कवडे वंदना चंद्रशेखर
  खान जुबेदाबी गफार खान
या निवडणुकीतील विशेष म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी निवडून आलेले सागर हिरे यांनी यापूर्वी नगरपालिकेत किंवा अन्य कुठलंही लाभाचपद स्वीकारलेलं नव्हतं परंतु निष्ठेचा कार्यकर्ता म्हणून आमदार सुहास कांदे यांनी सागर हिरे यांना थेट नगराध्यक्ष पदाचे तिकीट दिल्याने ते विजयी झाले आणि एक सामान्य कार्यकर्ता नगराध्यक्ष पदापर्यंत पोहोचू शकतो हे एक यातील विषय बाब आहे हे आमदार सुहास कांदे यांनी सिद्ध करून दिले आहे की निष्ठेने वागाल तर निश्चितच तुम्हाला यश मिळेल .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!