नाशिक ग्रामीण

अनिकेतच्या मृत्यूस कारणीभूत वाहन सापडले

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे

शिरवाडे वाकद दिनांक ८ डिसेंबर २०२५ :- निफाड तालुक्यातील थेटाळे – विंचूर रोडवरील त्रिफुली परिसरात २ डिसेंबर रोजी दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात उगाव पानेवाडी येथील १७ वर्षीय अनिकेत गोरख पानगव्हाणे याचा जागीच मृत्यू झाला होता. मात्र संबंधित वाहनचालक वाहन घेऊन फरार झाल्याने आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र पोलिस तपासात सदर वाहनाचा शोध लागला असून अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत अनिकेतचा भाऊ फिर्यादी चेतन गोरख पानगव्हाणे यांनी दिलेल्या फिर्यादीत, समोरून भरधाव वेगात येणाऱ्या टाटा कंपनीच्या पांढऱ्या – ग्रे रंगाच्या हायवा एम.एच.१२ वाय. क्यू.१८२१ वरील चालकाने दुर्लक्षपूर्वक वाहन चालवत अनिकेत चालवत असलेल्या होंडा शाईन मोटारसायकल एम.एच.१५ डी. एक्स एक्स ३८१६ ला जोरदार धडक दिली. धडकेमुळे अनिकेत खाली पडला असता, हायव्याच्या ड्रायव्हर साइडच्या मागील चाकाखाली त्याचे डोके आल्याने ते चेंगरून जागीच मृत्यू झाला अशी फिर्याद दिली आहे. त्यांचे फिर्यादी वरून आरोपी चालकाच्या विरोधात लासलगाव पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(अ)(ब), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायदा कलम १३४, १७७, १८४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मोहन पाटील पुढील तपास करीत आहेत.

किरणकुमार आवारे

किरणकुमार आवारे हे गेली ३० वर्षांपासून प्रिंट मीडियात काम करत आहेत. याकाळात त्यांनी दैनिक देशदूत, दैनिक लोकमत, दैनिक गांवकरी, दैनिक उलाढाल, दैनिक तरुण भारत, दैनिक सार्वमत, दैनिक आधुनिक केसरी, दैनिक लक्ष महाराष्ट्र, लोकनामा मध्ये काम केले आहे व करत आहेत. दैनिक लोकनामा मध्ये त्यांनी सलग १५० भाग गावगाडा हे सदर चालवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!