नाशिक ग्रामीण

मोठी बातमीः चांदवड तालुक्यात बाप,मुलगा आणि मुलगी विहीरीत… व्हिडीओ पहा

वेगवान नाशिक

चांदवड, ता. 26 नोव्हेंबर 25 ःचांदवड तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. तिघांनी विहीरीत उडी घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.

व्हिडीओ पहाः

यावरुन युट्यूब  लिंक ओपण करा

दिघवद रोकडबा वस्ती येथील विहिरीत वडील मुलगा व मुलगी पडून पाण्यात बुडून मुत्यु तर गोताखोर जलतरणपटू ऑक्सिजनच्या साह्याने व गावकरीच्या मदतीने काढले वरती

चांदवड तालुक्यातील दिघवद रोकडोबा वस्ती येथील दौलत रामभाऊ हिरे वय वर्षे 35 ते 40, मुलगी प्रज्ञा दौलत हिरे वय वर्षे नऊ, मुलगा प्रज्वल दौलत हिरे वय वर्षे चार हे आज दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास राहत्या घराच्या समोरील विहिरीत तिघांनी संगतीच विहिरीत उडी मारून पाण्यात पडून व बुडून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

चांदवड उपजिल्हा रुग्णालय मध्ये दाखल करण्यात आले. मात्र हा झालेला प्रकार कशामुळे आत्महत्या केली गेली हे मात्र अजून कळाले नाही .
तरी या घटनेचा पुढील चांदवड पोलीस तपास करीत आहे

Sahebrao Thakare

गेल्या पंचवीस वर्षापासून पत्रकारितेत क्षेत्रात कार्यरत, सकाळ, ॲग्रोवन, साम, देशदूत, पुण्यनगरी, टीव्ही नाईन मराठी,सध्या वेगवान मिडीया ग्रुपचे संपादक म्हणून सध्या कार्यरत, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, गुन्हेगारी, टेक्निकल, शेती, व्यवसाय विविध विषयांवर सखोल ज्ञान व लिखाण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!