लासलगाव मध्ये ज्वेलर्स शॉपमध्ये चोरी करणारी बंटी – बबलीची टोळी मालेगावात जेरबंद ; नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाई

वेगवान नाशिक / किरणकुमार आवारे
शिरवाडे वाकद दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ :- निफाड तालुक्यातील लासलगाव शहरातील वर्मा ज्वेलर्स दुकानामध्ये आलेले एक काळा बुरखा घातलेली अनोळखी महिला व तिच्यासोबत एक पुरुष यांनी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचे बहान्याने काऊंटर वरील ट्रेमधील दागिने पाहत असतांना त्यात असलेली ०५ ग्रॅम सोन्याची अंगठी किं. रू. ५५,०००/-ची हात चलाखीने काढुन चोरून घेवुन त्याऐवजी बनावट बेनटेक्सची अंगठी ठेवुन चोरी केल्याबाबत लासलगाव पोलीस ठाणेपेस गुरनं २७०/२०२५ भादवि कलम ३०३(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
जिल्हयातील नाउघड मालाविरुध्दचे गुन्हयांतील अभिलेखावरील आरोपीतांना चेक करून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांनी आदेशित केलेले आहे. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर यांचे पथकाने वरील गुन्हयाचे समांतर तपासात, यातील आरोपीतांची गुन्हा करण्याची पध्दत व त्यांचे देहबोलीवरून गोपनीय माहिती काढुन, मालेगाव शहरातील सलीमनगर, कुसुंबारोड परिसरातून खालील संशयीत महिला व पुरुषास ताब्यात घेतले आहे.
१) नाजिया शेख ईसराइल, वय ३२, रा. सलीम नगर, गल्ली नन. २, मालेगाव, जि. नाशिक
२) शेख करीम शेख आमीन, वय १९, रा. गायकवाड चौक, मालेगाव, जि. नाशिक
यातील ताब्यात घेतलेली महिला व पुरुष यांना विश्वासात घेवुन वरील गुन्हयाबाबत विचारपुस केली असता, त्यांनी दोघांनी मिळून माहे नोव्हेंबर महिन्याचे पहिल्या आठवडयात लासलगाव शहरात एका ज्वेलर्स दुकानातुन येवुन हातचलाखीने एक सोन्याची अंगठी चोरी करून त्याऐवजी बेनटेक्सची अंगठी दागिन्यांचे ट्रेमध्ये ठेवुन चोरी केली असल्याची कबुली दिली आहे. तसेच चोरी केलेली अंगठी मालेगाव शहरातील एका ज्वेलर्सचे दुकानामध्ये १५,०००/- रूपये किंमतीला मोडली असल्याबाबत सांगितले आहे. सदर दोन्ही आरोपींना गुन्हयाचे पुढील तपासकामी लासलगाव पोलीस ठाणेस हजर करण्यात आले असुन त्यांचेकडून ज्वेलर्स दुकानात झालेल्या चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री. आदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री. तेगबीर सिंह संधू यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र मगर, पोलीस अंमलदार प्रशांत पाटील, चेतन संवत्सरकर, सुधाकर बागुल, सुभाष चोपडा, दत्ता माळी, संदिप राठोड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, नितीन गांगुर्डे, महिला पोलीस अंमलदार अस्मिता मढवई, निकीता बोरसे यांचे पथकाने सदरचा गुन्हा उघडकीस आणुन कारवाई केली आहे.



