नाशिक ग्रामीण

सिन्नर बस अपघात ; माथेफिरू चालकाला वर कठोर कारवाई करा.. उदय सांगळे आक्रमक झाल्याने दहा लाखांची मदत…

वेगवान नाशिक ‌/ भाऊसाहेब हांडोरे

सिन्नर , दि : 20 नोव्हेंबर 2025 — माथेफिरू एसटी चालकासची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी.. सिन्नर बस स्थानकात बस प्लांट फॉर्म बस आणल्याने थेट प्रवासी बस स्थानकात घुसल्यामुळे एका नऊ वर्षांच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.तर तिन ते चार प्रवासी जखमी झाले आहेत..  बस चालकांकडून झालेला निष्काळजीपणामुळे एका कुटुंबातील मुलाचा नाहक बळी गेला आहे.. याला जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकारी यांना दोषी ठरवून तात्काळ कारवाई करण्यात यावी व अपाघात ग्रस्त कुटुंबांना तात्काळ मदत करा या मागणीसाठी उदय सांगळे. हेमंत वाजे आणि नामदेव लोंढे यांनी रस्ता रोको करत आक्रमक पवित्रा घेतला..  या सर्व गोष्टींचा विचार करून संबंधित अधिकाऱ्यांकडून सदर कुटुंबाला दहा लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली. व पुढील कागदपत्रे तयार करून अधिक मदत देण्याची हमी देऊन रस्ता रोको थांबवण्यात आला.. बुधवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास सिन्नर-देवपूर एसटी बसच्या धडकेत एका बालकाचा मृत्यू झाला तर, तीन प्रवाशी गंभीर जखमी झाले. ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला. यानिमित्ताने फलाटांची उंची वाढविण्याची गरज प्रकर्षाने समोर आली आहे.
Oplus_131072
आदर्श योगेश बोराडे (वय ९) असे मृत मुलाचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, आदर्श, त्याची आई गौरी योगेश बोऱ्हाडे (दापूर, ता. सिन्नर), आजी विठाबाई ज्ञानेश्वर भालेराव, आजोबा ज्ञानेश्वर रामकृष्ण भालेराव (रा. तामकडवाडी, ता. सिन्नर) यांच्यासह काही प्रवासी फलाटावर बसची वाट बघत उभे होते. नियंत्रण सुटलेल्या बसने थेट फलाटावर धडकत तीन ते चार जणांना चिरडले. या अपघातात आदर्श बोऱ्हाडे हा बालक गंभीर जखमी झाला. तर, आई गौरी, आजी विठाबाई व ज्ञानेश्वर भालेराव यांच्यासह मीराबाई आव्हाड, वनिता मोहिते आदी जखमी झाले.
गेल्यावर्षीही घेतला महिलेचा बळी
गेल्यावर्षी शिर्डीहून नाशिकला जाणाऱ्या इलेक्ट्रिक बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने मेळा बसस्थानकातील एका महिलेचा बळी गेला होता. तसेच, दोन जण गंभीर जखमी झाले होते. मेळा बसस्थानकात आलेली ई-बस फलाटावर चौकशी कक्षासमोर थांबली होती. यावेळी चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस चौकशी कक्षासमोर उभ्या तिघांना धडकली होती.
गंभीर जखमी आदर्शला डोक्याला जबर मार लागल्याने त्याची प्रकृती गंभीर होती. त्याला उपचारांसाठी नाशिकला नेताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे बोऱ्हाडे कुटुंबासह गावावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेनंतर संतप्त नागरिक व नातेवाईकांनी नाशिक-सिन्नर महामार्गावर रास्ता रोको करत निषेध नोंदवला. उदय सांगळे, हेमंत वाजे व नामदेव लोंढे यांनी घटनास्थळी येऊन एसटी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला. नादुरुस्त बस रस्त्यावर का सोडली, बसस्थानकातील बेशिस्तीवर नियंत्रण कुणाचे, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
सिन्नर बसस्थानकात एसटीची धडक
बालक ठार, तीन प्रवाशी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
संतप्त प्रवाशांचा रास्ता रोको आंदोलन केले होते..
Oplus_131072

 संबंधित विभागाला दोषी ठरवून तात्काळ कारवाई करण्यात येईल यांची लेखी हमीपत्र लिहून द्यावे तरच मृतदेह ताब्यात घेतला जाईल असा आक्रमक पवित्रा घेत उदय सांगळे यांनी न्याय देण्याचे व कार्यवाही करण्याची मागणी केली. व तसेच अपघात ग्रस्त कुटुंबांना मदत करण्याची मागणी केली असता सदर कुटुंबाला दहा लाख रुपये देण्याची कबूल केली असून आणखी काही कागदपत्रानुसार मदत करण्याची कबूल केली आहे. याप्रसंगी उदय सांगळे यांनी पोलीस अधिकारी व एसटी अधिकारी यांना चांगले धारेवर धरून जाब विचारला असता . संबंधितावर योग्य ती कठोर कार्यवाही करून कुटुंबाला न्याय देण्याचे आश्वासन वरिष्ठ अधिक पोलिस अधिकारी यांनी दिली आहे .तयानंतर सविस्तर चर्चा होऊन सामंजस्य व योग्य चर्चा होऊन सदर रस्ता रोको थांबवण्यात आला.. सदर रस्ता रोको थांबवण्यात आला असून पुढील कार्यवाही करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.. असा आधारदिला कुटुंबातील सदस्यांना दिला..
परंतु.. नांदुरस्त गाडी चालू करून प्लॅटफॉर्म लावण्यासाठी कर्मचारी हा माथेफिरू असला पाहिजे असा आरोप करत या घटनेची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी उदय सांगळे यांनी यावेळी केली .

 

भाऊसाहेब हांडोरे

भाऊसाहेब हांडोरे - पत्रकार... सिन्नर वेगवान मिडिया साठी कार्यरत, गेल्या 26 वर्षेपुर्वी दैनिक गावकरी या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून सुरुवात ... दै. सकाळ , लोकमत, देशदुत, पुण्यनगरी. राम भुमी, पत्रकार म्हणून काम..... 2023 पासून वेगवान मराठी. वेगवान नाशिक. वेगवान न्यूज या मिडिया नेटवर्कर सिन्नर तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत... उद्योग.शेती.क्राईम.खेळ.बिजिनेस. व राजकीय घडामोडी.सामाजिक. क्षेत्रात सखोल माहिती. लेखन व वाचन ची आवड....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!