Uncategorizedनाशिक ग्रामीण

खा. राजाभाऊ वाजे यांचे काका यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश… बिहार च्या विजयाचं सिन्नर कनेक्शन.. ?

स्थानिक नेतृत्वाच्या दुटप्पीपणा धोरणांमुळे शिवसेनेला फटका...

वेगवान नाशिक / भाऊसाहेब हांडोरे

WEGWAN News  सिन्नर , दि ; 16 नोव्हेंबर — नगरपरिषद निवडणुकीत सिन्नर मध्ये राजकीय समीकरणे जुळवून घेणे गरजेचे आहे त्यादृष्टीने बैठकांच सत्र सुरू आहे. तर दुसरीकडे मात्र  एकेकाळी  शिवसेना चा बालेकिल्ला समजला जाणारा सिन्नर तालुक्यातील ठाकरे गटाला एकामागून एक जोरदार धक्के बसत आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करता येथील स्थानिक नेतृत्वाच्या दुटप्पी भूमिका व धोरण कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.मात्र याचा परिणाम तालुक्यातील सर्वसामान्य जनता द्विधा मनःस्थितीत आहे ,परंतु एके काळी ज्यांच्या भरवशावर मंत्री माणिकराव कोकाटे यांना शह देण्यासाठीच सक्रिय सहभाग घेणारे उदय सांगळे. भारत कोकाटे. आणि खासदार राजाभाऊ वाजे यांचें काका व माजी नराध्यक्ष हेमंत वाजे यांनी ऐन नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर या मातब्बर नेत्यांनी साथ सोडून सत्ताधारी पक्षाच्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केला व खासदार वाजे यांना जोरदार धक्का दिला… हेमंत वाजे यांनी सांगितले की. सिन्नर मध्ये अजुन बरीच मोठी कामे पूर्ण नाही ते पुर्ण व नवीन कायापालट करण्यासाठी विकासाच्या मुद्यावर लढणार्या भाजपमध्ये प्रवेश करण्याचे कारण स्पष्ट केले आहे.

Oplus_131072

परंतु भाजपमधुन आलेले उदय सांगळे यांनी ठाकरे गाटाचे तत्पूर्वी चे आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला.. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून उदय सांगळे यांच्या पत्नी शितलताई सांगळे यांना संधी दिली.असे असतानाच नाशिक लोकसभा निवडणुकीत उदय सांगळे यांनी उघडपणे खासदार वाजे यांना विरोध करून माजी खासदार हेमंत गोडसे यांना साथ दिली होती. मात्र याच काळात एक सिन्नरचा माणूस खासदार होतोय भावनेतून मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विरोधी पक्षात असतांना सुद्धा खासदार वाजे यांना आतुन मदत केली.. या सर्व गोष्टींची परतफेड म्हणून  खा.वाजे यांनी मागील विधानसभा निवडणुकीत उदय सांगळे यांच्या विरोधात काहीशी दुटप्पी भूमिका घेतली .खासदारकीच्या निवडणुकीचा वचपा काढला.. आणि माणिकराव कोकाटे यांच्या परतफेड करत उदय सांगळे यांनी पराभुत करण्यात कारणीभूत ठरले . अशी भावना झाल्यानंतर उदय सांगळे काहीशे नाराज असल्याचे दिसत होते. योग्य वेळी उदय सांगळे यांनी शरद पवार गटाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच मंत्री कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला. व त्या पाठोपाठ खुद्द ठाकरे गटाचे नेते व खासदार राजाभाऊ वाजे यांचें काका व माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे यांनी सुद्धा श्री . वाजे यांना सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला.. त्यामुळे एकापाठोपाठ एक धक्क्याने सिन्नर मध्ये उद्धव ठाकरे गटाला तिहेरी धक्का बसला असून पक्षाला खिंडार पडले आहे.. या सर्व पार्श्वभूमीवर सिन्नरमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून खासदार राजाभाऊ वाजे नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.. परंतु तालुक्यातील राजकारण मात्र मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या भोवती फिरत असतं .या सर्व पार्श्वभूमीवर मंत्री कोकाटे यांच्या कडून काय  रणनीती आखली जाते हे पहाणं महत्वाचे ठरणार आहे..
विरोधांकाच्या एकमेकांच्या परतफेडीसाठी स्वतः च्या पक्षातील नेत्यांच्या जिरवा जिरवी नादात तथापि या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असल्याची चर्चा सुरू आहे.. त्याचाच हा एक भाग म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
उदय सांगळे यांच्या शहला काट शह देण्यासाठी मंत्री माणिकराव कोकाटे व खासदार राजाभाऊ वाजे हे नेमकी काय भूमिका घेतात आणि कोणती राजकीय खेळी करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.. या सर्व घडामोडी मुळे सिन्नर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहे हे निश्चित …

Oplus_0
Oplus_0

बिहार मधील भाजपचा विजया मागे सिन्नर चं कनेक्षण… मंत्री गिरीश महाजन..

शिवसेनेचे उद्धव ठाकरे गट खासदार राजाभाऊ यांचे काका तथा सिन्नरचे माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे यांनी शुक्रवारी काही माजी नगरसेवक सह म्हणती गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला नाशिक शहरातील भाजपच्या व स्मृती या कार्यालयात शुक्रवारी प्रवेश प्रवेश झाला होता.

यावेळी बिहार मध्ये भाजपला विजय मिळाला..  हेमंत वाजे भाजपमध्ये प्रवेश करताच पक्षाला यश हे योगायोग नसुन श्री.वाजे यांचा पायगुण चांगला आहे म्हणून.,

पुढील काळात सिन्नर मध्ये सुद्धा हा बदल लवकरच पाहायला मिळेल असे ही कुंभ मेळा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले…

भाऊसाहेब हांडोरे

भाऊसाहेब हांडोरे - पत्रकार... सिन्नर वेगवान मिडिया साठी कार्यरत, गेल्या 26 वर्षेपुर्वी दैनिक गावकरी या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून सुरुवात ... दै. सकाळ , लोकमत, देशदुत, पुण्यनगरी. राम भुमी, पत्रकार म्हणून काम..... 2023 पासून वेगवान मराठी. वेगवान नाशिक. वेगवान न्यूज या मिडिया नेटवर्कर सिन्नर तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत... उद्योग.शेती.क्राईम.खेळ.बिजिनेस. व राजकीय घडामोडी.सामाजिक. क्षेत्रात सखोल माहिती. लेखन व वाचन ची आवड....

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!