या शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 जे वर टवाळखोरांचा उच्छाद – नागरिक त्रस्त
Nandgaon News
या शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 जे वर टवाळखोरांचा उच्छाद – नागरिक त्रस्त
वेगवान मराठी : प्रतिनिधी
नांदगाव दि 4 नोव्हेंबर 2025 नांदगाव शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 जे हा मालेगाव ते मनमाड या मार्गावरील अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे. या महामार्गावर नांदगाव शहर हद्दीत — विशेषतः नांदगाव कॉलेज ते मालेगाव रोड या परिसरात — अनेक लहानमोठे व्यवसाय, चहाचे स्टॉल, गाड्या, आणि किरकोळ दुकाने थाटलेली आहेत.अलीकडच्या काळात या परिसरातील काही चहाच्या ठेल्यांवर स्थानिक टवाळकोर तरुणांचा वावर वाढला आहे. हे तरुण दुचाकीवरून वेगाने आणि नागमोडी पद्धतीने वाहन चालवत परिसरात येतात. अनेक वेळा ते इतर वाहनधारकांना अचानक चकवा देत धोकादायक कसरती करतात, ज्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होतो.या टवाळकोरांचे वर्तन अत्यंत उद्धट असून, ते इतर नागरिकांना आणि वाहनधारकांना घाबरवून “मी कोणाचा माणूस आहे”, “मला ओळखत नाहीस का” अशा प्रकारच्या दमबाजीच्या, दबाव आणणाऱ्या आणि एकेरी भाषेत बोलण्याच्या व अंगावर धाऊन जाणे या घटना घडत आहेत. या वर्तनामुळे सामान्य नागरिक, दुकानदार आणि विद्यार्थी वर्ग भयभीत झाला आहे.स्थानिक नागरिक, व्यापारी, आणि विद्यार्थी यांच्यात या घटनांविषयी तीव्र नाराजी असून, त्यांनी प्रशासन आणि पोलिसांकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. संबंधित ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, पोलीस गस्त वाढविणे, तसेच दुचाकीस्वारांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.नांदगाव पोलीस ठाण्याने या परिसरातील टवाळखोरांवर लक्ष ठेवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.या संदर्भात एका जागरुक नागरिकाने नांदगांव पोलीस व री ष्ट अधिकाऱ्यांना कळविण्यात आले .



