Uncategorizedनाशिक ग्रामीण
देवळ्यात ‘रन फॉर युनिटी’: ५ कि.मी. एकता दौडचे आयोजन -पो.नि. सार्थक नेहेते यांची माहिती

वेगवान नाशिक / बाबा पवार
देवळा : राष्ट्रीय एकता दिन (National Unity Day) आणि पोलीस शहीद सप्ताहानिमित्त देवळा पोलीस स्टेशनने ‘रन फॉर युनिटी’ (एकता दौड) या ५ किलोमीटर मॅरेथॉन/वॉकेथॉनचे आयोजन केले आहे. या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी केले आहे.
हा उपक्रम दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ६.३० वाजता सुरू होईल. दौड शिवस्मारक, पाच कंदील चौक येथून सुरू होऊन ५ कि.मी. अंतर पार करून त्याच ठिकाणी समारोप होईल.
पोलीस निरीक्षक नेहेते यांनी सांगितले की, या दौडच्या माध्यमातून पोलीस शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रीय एकता व अखंडतेचा संदेश दिला जाईल. देवळ्यातील नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी आणि संस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन देशभक्तीची भावना व्यक्त करावी.
हा उपक्रम विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे.
सहभागी होण्यासाठी इच्छुक नागरिकांनी पो.नि. सार्थक नेहेते (9422666775), सपोनि नंदा पाटील (8419953444), PSI मनोज कुवर (7350826369) किंवा PC दिलीप सोनवणे (7709534091) यांच्याशी संपर्क साधावा.



