
६ लाखांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा व पान मसाला जप्त; दोघांना अटक
वेगवान मराठी : मारुती जगधने
” दि 26 ऑक्टेंबर 2025 ”
): नादगांव पोलिसांनी मोठी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित पान मसाला वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत ₹६,८६,३२५/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कारवाईचा तपशील:
गुन्हा नोंद: CCTNS गु.र. नं. ४६६/२०२५, भारतीय दंड संहिता आणि सिगारेट व अन्य तंबाखू उत्पादने (COTPA) कायद्याअंतर्गत
आरोपी: संशयीत
जितेश अशोक कुरलये (वय ४४)दत्ता अशोक बोडके (वय ३५) रा . हनुमान नगर गरखेडा गल्ली नं ४ छ . संभाजी नगर
तक्रारदार: अंमलदार माणिकराव जाधव (वय ३६), नांदगांव पोलीस स्टेशन
घटना: २६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता, न्यायडोंगरी चौफुल्ली परिसरात
मुद्देमाल जप्त:
राज निवास पान मसाला – १५०० पॅकेट (₹३,०६,०००/-)
प्रीमियम जाफराणी जर्दा – १५७५ पॅकेट (₹८०,३२५/-)
इन्होव्हा कार (MH 21 S 9099) – ₹३,००,०००/-
एकूण किंमत: ₹६,८६,३२५/-
आरोपी हे प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला विक्रीसाठी इन्होव्हा वाहनातून वाहतूक करत असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.
तपास अधिकारी: ए.एस.आय. सानप
नांदगांव पोलिसांनी या कारवाईतून अवैध गुटखा व तंबाखू पदार्थांच्या विक्रीविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेला आणखी गती दिली आहे. पुढील तपास नांदगांव .पोलिसांकडून सुरू आहे.



