नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

तालुक्यात परतीच्या पावसाचा तडाखा

Nandgaon News

 

वेगवान मराठी :: मारुती जगधने

॥ नांदगांव दि .2 4 ऑक्टोंबर 2025 ॥

नांदगाव-मनमाड तालुक्यात बे-मोसमी पावसाचे आगमन; रब्बी पिकांना जीवदान, मात्र वैरणीचे नुकसान

  • : नांदगाव व मनमाड शहरासह संपूर्ण तालुक्यात सायंकाळी सुमारास पाच वाजता बे-मोसमी पावसाने हजेरी लावली. साधारण अर्धा ते एक तास कोसळलेल्या या मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे परिसरातील वातावरण प्रसन्न झाले.

या अनपेक्षित पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला असून जमिनीतील ओलावा वाढल्याने पिकांची वाढ जोमाने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रब्बी पिकांचे पुनरुज्जीवन होईल, असा आशावाद शेतकरी व्यक्त करत आहेत.

मात्र या पावसामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वैरणीसाठी शेतात वाळवण्यासाठी ठेवलेला चारा पावसामुळे भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला असून त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तालुक्यातील नांदगाव, मनमाड, पिंपळगाव, खेडगाव, सोनजळगाव, साकुर या परिसरात पावसाची विशेष नोंद झाली आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना भिजलेल्या चाऱ्याचे तत्काळ वाळवणे, तसेच रब्बी पिकांसाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!