वेगवान मराठी : मारुती जगधने
॥ दि . 18 ऑक्टोंबर 2025 ॥
- नांदगाव दिवाळी सणा निमित्त सासुरवाशीन माहेरी येत असल्याने चोरटे आता संधी साधून महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून पसार होत असल्याच्या घटना घडत आहे .
गुरुवारी आठवडे बाजार च्या दिवशी
साकोरा येथील एका प्रवाशी महिलेच्या गळ्यातील आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पोत अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली.
दिपाली संजय सोनवणे या महिला इतर महिलांसह बाजार करून नांदगांव ते सावरगाव बसमध्ये चढत असताना गर्दीत त्यांच्या गळ्यातील सोन्याचे पोत बस स्थानकात चोरीस गेले. यावेळी काही प्रवाशांनी दोन अल्पवयीन मुली व दोन महिलांना संशयास्पदरीत्या गर्दी करताना पाहिले होते. घटनेची माहिती तात्काळ नांदगाव पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी संशयाच्या आधारे एक महिला आणि दोन अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतले, मात्र आणखी एक महिला फरार झाली. चौकशीदरम्यान पोलिसांना कोणताही खात्रीशीर पुरावा न मिळाल्याने, १७ ऑक्टोबर रोजी तिघींना सोडण्यात आले. फरार महिलेसाठी शोध सुरू असून, या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



