नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

दिव्यांग लाभार्थ्यांना वाढीव अनुदान न मिळाल्याने तहसीलसमोर ठिय्या आंदोलन

Nandgaon News

 

 दिव्यांग लाभार्थ्यांना वाढीव अनुदान न मिळाल्याने तहसीलसमोर ठिय्या आंदोलन

वेगवान मराठी | मारुती जगधने | दि. ऑक्टोबर २०२५ | नांदगाव

नांदगाव तहसील कार्यालयासमोर प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या वतीने १३ ऑक्टोबर (सोमवार) रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले.

शासनाने १५ सप्टेंबर २०२५ रोजी दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्याचा दर रु.१५०० वरून रु.२५०० करण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयानुसार लाभार्थ्यांची माहिती, आवश्यक कागदपत्रे — ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र, यूडीआयडी कार्ड, आधारकार्ड आणि बँक पासबुक — तहसील कार्यालयामार्फत जमा करण्यात आली होती.

मात्र, ७ ऑक्टोबर २०२५ रोजी लाभार्थ्यांच्या खात्यात फक्त जुने रु.१५०० इतकेच अनुदान जमा झाले. त्यामुळे शासन निर्णयानुसार वाढीव रु.१००० न मिळाल्याने दिव्यांग लाभार्थ्यांत संताप व्यक्त झाला आणि ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला.

आंदोलनादरम्यान नांदगाव तहसीलदार सुनील सौदाणे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन शासनाकडे निवेदन पाठवून योग्य तो पाठपुरावा केला जाईल आणि लाभार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असे आश्वासन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!