नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

या मार्गावर रहदारी ठप्प — रस्त्याच्या कामामुळे वाहनधारक त्रस्त

Nandgaon News

या मार्गावर रहदारी ठप्प — रस्त्याच्या कामामुळे वाहनधारक त्रस्त

वेगवान मराठी : मारुती जगधने

॥ दि १२ ऑक्टोंबर २०२५ ॥

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव ते वेहळगाव मार्गे पिलखोड-चाळीसगाव या महत्त्वाच्या मार्गाचे मजबुतीकरण व काँक्रिटीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. बहुतांश काम पूर्णत्वाकडे गेले असले तरी नांदगावच्या दिशेने उर्वरित भागावर काम सुरू असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

विशेषतः नांदगाव ते साकोरा या दरम्यान नव्या रस्त्याच्या दुरुस्ती आणि कामकाजामुळे रस्त्याचा मोठा भाग खोदलेला असून, दोन्ही बाजूने वाहने एकमेकांत अडकून पडतात. परिणामी वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे, तसेच दररोज लहान-मोठे अपघात घडत असल्याचेही समोर येत आहे.

आज सायंकाळी तर साकोरा परिसरात काही काळ रहदारी संपूर्ण ठप्प झाली, अनेक दुचाकी, चारचाकी आणि मालवाहतूक वाहने रांगेत अडकून पडली. काम सुरू असलेल्या ठिकाणी वाहतुकीचे पर्यायी नियोजन न झाल्याने वाहनचालकांमध्ये प्रचंड नाराजी दिसून आली.

स्थानिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, काम सुरू असतानाच वाहतुकीसाठी योग्य पर्यायी मार्ग तयार करावा आणि रात्रौच्या वेळेत कामाचा वेग वाढवावा, जेणेकरून जनतेला होणारा त्रास कमी होईल.

वाहनधारकांनी तात्पुरता पर्याय म्हणून सकाळ- संध्याकाळी गर्दीच्या वेळी प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!