- या . . . सबस्टेशनअंतर्गत गावांना आता दिवसा नियमित थ्री फेज वीजपुरवठा
- वेगवान मराठी : मारुती जगधने
नांदगाव, दि. ९ ऑक्टोबर २०२५
पांझणदेव सबस्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांतील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. उद्यापासून म्हणजेच गुरुवार, दि. ९ ऑक्टोबर २०२५ पासून या भागात नियमित दिवसा थ्री फेज वीजपुरवठा सुरू होत आहे.
नवीन सौर ऊर्जा प्रकल्प (Solar Project) पांझणदेव सबस्टेशनला जोडण्यात आला असून, त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. यापुढे शेतकऱ्यांना रात्री किंवा अपरात्री पिकांना पाणी देण्यासाठी उठावे लागणार नाही, कारण आता दररोज सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत दिवसा सातही दिवस नियमित थ्री फेज वीज उपलब्ध होणार आहे.
सौर प्रकल्पाच्या माध्यमातून तयार होणारी स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा स्थानिक वीजजाळ्याला जोडल्याने ग्रामीण भागातील वीजपुरवठ्याची स्थिरता आणि सातत्य मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. विशेषतः शेतकऱ्यांना सिंचनासाठी योग्य वेळी वीज मिळाल्याने शेती व्यवस्थापन अधिक सुलभ होईल.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा वीजपुरवठ्यावरील विश्वास वाढेल आणि ऊर्जा विभागाच्या सौर उपक्रमांना बळकटी मिळेल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.



