किकवारीत प्रहार संघटनेचा भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन,प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चुभाऊ कडू राहणार उपस्थित

वेगवान नाशिक/तुषार रौंदळ
सटाणा दि.२आक्टोबर २०२५: – शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ आदी घटकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी असलेल्या हक्क यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चुभाऊ कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता बागलाण तालुक्यातील किकवारी खुर्द येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश काकूळते यांनी दिली.
यावेळी प्रामुख्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर माजी मंत्री बच्चुभाऊ कडू मार्गदर्शन करणार असून, प्रहार जनशक्ती पक्ष, स्वर्गीय शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना, कांदा उत्पादक संघटना आदी पदाधिकारी – कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. कर्जबाजारी शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्यासाठी संघटित लढ्यात शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन काकूळते यांनी केले आहे



