नाशिक ग्रामीणलोकल बातम्या

कांदा गाडी पलटी — चालक बचावला

Nandgaon News

 

कांदा गाडी पलटी — चालक बचावला

वेगवान मराठी : मारुती जगधने

 [ दिनांक 23 सप्टेबर 2025 ]

नांदगाव तालुक्यातील कासारी शिवारातील चांदेश्वरी बोलठाण घाटात काल मध्यरात्री १२ वाजता कांदा भरलेली ट्रक गाडी घसरून पलटी झाली. घाटमाथ्यावर जोरदार पावसामुळे रस्त्यावर चिखल खडडे व घसराडपणा निर्माण झाल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जाते.

गाडीतील सर्व कांद्याच्या पोत्यांचा ढीग खाली कोसळला असून काही पोती रस्त्याबाहेर पडली आहेत. सुदैवाने या अपघातात चालक व इतर कोणीही जीवितहानी झाली नाही. मात्र शेतकरी व व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे कांद्याचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. दरम्यान, या घाटातील सततचे अपघात व रस्त्याची बिकट अवस्था याबाबत नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे.दरम्यान कांद्याने भरलेला मालवाहू ट्रक बोलठाण जातेगाव भागातून गुजरात मध्ये जात होता. चांदेश्वरी घाटामध्ये उतरताना ही गाडी घसरून दरीत कोसळले यामध्ये चालकाचा पाय गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले मात्र याबाबत कोणतीही खबर पोलिसात दाखल झालेले नाही .नांदगाव बोलठाण रस्त्यावरती  देखील प्रचंड खड्डे पडले रस्ता खच ला म्हणून येथे नेहमी अपघात होत असतात सातत्याने अपघात होत असल्याने वाहनधारक या मार्गाला त्रस्त झाले आहेत मात्र यावरती उपाययोजना होत नाही परिस्थितीजैसे तेच आहे आहे त्यामुळे गंभीर प्रश्नाला वाचा कोणी फोडायचे हा प्रश्न उद्भवला .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!