शेती

कांद्याला अनुदान आणि हमीभाव द्या, अन्यथा महामार्गांवर कांदे टाकणार

कांद्याला अनुदान आणि हमीभाव द्या, अन्यथा महामार्गांवर कांदे टाकणार

वेगवान मराठी /एकनाथ भालेराव

येवला: दिनांक :19 सप्टेंबर 2025

येवला तालुक्यातील सत्यगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत कांद्याला प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान द्या आणि चाळीतील कांदा 3000 रु ने खरेदी करा अन्यथा परिसरातील सर्व शेतकरी कांदा नाशिक संभाजी नगर महा मार्गांवर आणून टाकतील असा इशारा सत्यगाव येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.
या मागणीचा ठरावच ग्रामसभेत मांडून बहुमताने मंजूर करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे पदाधिकारी बाळकृष्ण पंडित सांगळे, सरपंच सुनील सांगळे, उपसरपंच विठोबा बर्डे, माजी सरपंच नानासाहेब सांगळे, सदस्य नाना सानप, शिव गोंडे, सर आबा सांगळे, विठ्ठल सानप, गणेश आव्हाड, सुदाम दराडे, चंद्रभान आव्हाड, माजी सरपंच सरला महेश आव्हाड, माजी चेअरमन शंकर सूर्यभान दराडे आदी मान्यवर उपस्थित होते.

ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती असलेल्या या ग्रामसभेत कांद्याच्या दरवाढीसाठी आणि शेतकऱ्यांना योग्य तो आधार मिळावा यासाठी ठराव एकमुखी पारित करण्यात आला.

एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी, लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, वेगवान मराठी नेटवर्कचे येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम, शेती, उद्योग, खेळ, बीजनेस आदी विषय सखोल माहिती , व लेखनाची आवड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!