नाशिक ग्रामीण
उद्या सटाण्यात भव्य रास्ता रोकोचे आयोजन,कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर होणार अन्याय व निद्रिस्त व्यवस्थेला जाग आणण्यासाठी

वेगवान नाशिक/तुषार रौंदळ
सटाणा दि.१४सप्टेंबर२०२५:-
उद्या दि. 15/09/2025 रोजी सकाळी ठीक 9 वा. कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्याया बद्दल वाचा फोडण्यासाठी आणि सरकारी व्यवस्थेला जाग आणण्यासाठी भव्य रास्ता रोकोचे आयोजन करण्यात आले आहे.या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन हि आंदोलनात सहभागी संघटनांनी केले आहे.
ठिकाण -:
शिवतीर्थ सटाणा (चार फाटा)
* आयोजक -: राहुल वसंतराव सोनवणे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सटाणा .
बागलाण तालुका शेतकरी संघटना (शरद जोशी प्रणित )
रयत क्रांती संघटना.
प्रहार शेतकरी संघटना
कांदा उत्पादक शेतकरी संघटना



