अंतापुर जवळ तिहेरी अपघात,तीन मजुरांचा जागीच मृत्यू

वेगवान नाशिक/तुषार रौंदळ
सटाणा दि.११सप्टेबर :- बागलाण तालुक्यातील अंतापूर ते मुल्हेर गावाजवळ एक भीषण तिहेरी अपघात झाला असून ताहाराबादकडून बोरदैवतकडे मजूर घेऊन जाणाऱ्या पिकअप गाडी क्रमांक एम एच ०५ बी एच २०४६ ला आयशर गाडीने अचानक कट मारल्याने पिकअप आणि समोरून येणाऱ्या टाटा जेस्ट कार क्रमांक एम एच ४१वी ८५६४ कारचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पिकअपमधील तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून इतर १०-१२ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ नामपूर ग्रामीण रुग्णालय तसेच सटाणा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सायंकाळी बोरदैवतकडे मजूर घेऊन जाणारी पिकअप अंतापूर गावा जवळून जात असताना भरधाव वेगात येणाऱ्या आयसर गाडीने अचानक कट मारला. यामुळे तिहेरी अपघात झाला. अपघातात जागीच मृत्यू पावलेले तीनही मजूर हे बोरदैवत परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती असून मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. पुढील तपास जायखेडा पोलीस करीत आहेत.



