सिन्नर मध्ये गणेश विसर्जनाला गालबोट, पाय घसरून पडल्याने एकाचा मृत्यू

सिन्नर: शहर व परिसरात गणेश विसर्जन उत्साहात पार पडत असतानाच शहरालगत सरदवाडी धरणावर गणेश विसर्जनासाठी गेलेल्या एका भाविकाचा विसर्जन करीत असताना दुर्दैवी अंत झाल्याने गणेश विसर्जनाला गालबोट लागले. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात
ओम प्रकाश सुंदरलाल लीलारे , वय वर्ष 40 रा. सिल्वर लोटस स्कूल, नाशिक पुणे रोड,सिन्नर. मूळ रा. गोंदिया, हे दुपारी 15:40 वाजेच्या दरम्यान गणपती विसर्जना करिता गेले असता पाय घसरून पाण्यात पडले. त्यांना त्यांच्यासोबत असणारे धोंडीबा डोनर व इतर लोकांनी शोध घेऊन पाण्यातून काढून उपचारासाठी शिवाई हॉस्पिटल मार्फतीने सिन्नर ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
सिन्नर पोलीस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते. सिन्नर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सुहास सुधाकर गोसावी करीत आहे.



