महाराष्ट्र,देश

न्यायप्रक्रियेला नवी दिशा – येवला शहरात ‘शोध-एक्स फॉरेन्सिक सर्व्हिसेस’चे उद्घाटन

न्यायप्रक्रियेला नवी दिशा – येवला शहरात ‘शोध-एक्स फॉरेन्सिक सर्व्हिसेस’चे उद्घाटन

वेगवान मराठी /एकनाथ भालेराव

येवला :- दिनांक :30ऑगस्ट :

आधुनिक न्यायवैज्ञानिक तपासणी ग्रामीण पातळीवर पोहचवण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल म्हणून शोध-एक्स फॉरेन्सिक सर्व्हिसेस या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेचे भव्य उद्घाटन सोहळा रविवार, दि. ३१ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. उद्घाटन समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र कॅडरच्या आयपीएस अधिकारी प्रियांका मोहिते उपस्थित राहून संस्थेचे लोकार्पण करतील.

संस्थेमार्फत डिजिटल फॉरेन्सिक, दस्तऐवज तपासणी, क्राईम सीन तपासणी, ऑडिओ-व्हिडिओ विश्लेषण तसेच विविध न्यायवैज्ञानिक सेवा उपलब्ध होणार आहेत. गुन्हेगारी तपासातील गुंतागुंती सोडवताना शास्त्राधारित पुरावे न्यायालयात सादर करण्यासाठी या सेवांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

“सत्य, विज्ञान आणि न्याय या तिन्ही गोष्टींचा संगम साधण्याचे ध्येय घेऊन ‘शोध-एक्स फॉरेन्सिक सर्व्हिसेस’ कार्यरत राहील. ग्रामीण भागातील नागरिकांनाही उच्च प्रतीच्या फॉरेन्सिक तपासण्या स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देणे हा आमचा उद्देश आहे,” असे संस्थापक श्रुती खैरनार व महेश ज्ञानेश्वर थोर यांनी सांगितले.

उद्घाटन सोहळा डॉ. खैरनार यांच्या स्माईल केअर डेंटल क्लिनिक, तुलजा भवानी कॉम्प्लेक्स, ममता स्वीट्सजवळ, विंचूर, येवला येथे पार पडणार असून, या कार्यक्रमाला स्थानिक मान्यवर व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क : 9503611861 / 8408090047

 

डॉ. खैरनार दंतचिकित्सालयाचा २५ वा वर्धापन दिन सोहळा

येवला शहरातील स्माईल केअर डेंटल क्लिनिक या दंतचिकित्सालयाने आपल्या कार्याची २५ वर्षे पूर्ण केली आहेत. या निमित्ताने ३१ ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ४ वाजता क्लिनिकच्या परिसरात वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

डॉ. खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पंचवीस वर्षांपासून या दवाखान्याने सातत्याने दंतउपचार सेवा पुरवली आहे. रुग्णांची काळजी, आधुनिक वैद्यकीय कौशल्य, प्रामाणिकपणा आणि सातत्यपूर्ण सेवा यामुळे क्लिनिकने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

सोहळ्याच्या दिवशी धन्वंतरी पूजन होणार असून मान्यवरांच्या उपस्थितीत कृतज्ञता सोहळा साजरा करण्यात येणार आहे.

ठिकाण: तुळजा भवानी कॉम्प्लेक्स, ममता स्वीट्सजवळ, विंचूर रोड, येवला.

रुग्णांचा विश्वास आणि सेवाभाव या दोन बळावरच २५ वर्षांची यशस्वी वाटचाल शक्य झाली असल्याचे डॉ. खैरनार यांनी सांगितले.

एकनाथ भालेराव

वेगवान ऑनलाईनमध्ये येवला तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत. २४ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. गांवकरी, देशदूत,, पुण्यनगरी, लोकमत पत्रकार म्हणून काम. २०१४ पासून वेगवान न्यूज, वेगवान नाशिक, वेगवान मराठी नेटवर्कचे येवला प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. राजकारण, टेक, क्राईम, शेती, उद्योग, खेळ, बीजनेस आदी विषय सखोल माहिती , व लेखनाची आवड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!